शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नातेपुतेत मध्यरात्रीत सराफाचे दुकान फोडले, सीसीटीव्ही डिवाइसह १४ लाखांचे दागिने लंपास

By काशिनाथ वाघमारे | Updated: December 25, 2023 21:48 IST

भुस्सा पोती रिकामी करुन दागिने पळवले, नकली दागिन्यांना हातही लावला नाही

सोलापूर: नातेपुतेच्या बाजारपेठेतील एका सराफाचे दुकान सोमवारी मध्यरात्री फोडून चोरट्यांनी भुश्शांची पोती रिकामी करुन त्यात १४ लाख २० हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने पळवून नेले. इतकेच नव्हे तर दुकानातील सीसी टीव्हीच्या डीव्हाईसह हे दागिने पळविल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.

याबाबत राजेश चंद्रशेखर चंकेश्वरा यांनी पोलिसात धाव घेतली.  सोमवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट पथकाला पाचारण केले होते. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार नातेपुते -वालचंदनगर रोडवर मुख्य बाजारपेठेत राजेश चंकेश्वरा यांचे खाली दुकान आणि वरच्या मजल्यावर घर आहे. रविवारी रात्री जेवण उरकून वरच्या मजल्यावर झाेपी गेले. सोमवारी मध्यरात्री उत्तर दिशेचे शटर उचकटून प्रवेश केला. दुकानातील मुख्य दरवाजाची चावी त्यांना मिळाली. दुकानाच्या मागील बाजूस भुशाचे पोते रिकामे करून या पोत्यात पैंजण आणि जोडवी नेल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे.सकाळी सात वाजेदरम्यान दुकान मालकास चोरी निदर्शनास आली. चोरट्यांनी दुकानातील सर्व सी सी कॅमे-यांच्या वायरी तोडून डिवाइस पळविल्याचे निदर्शनास आले.

घटना समजताच नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे, फौजदार विक्रांत ढिगे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. त्यानंतर सोलापुरातून श्वान पकथक आणि फिंगरप्रिंटला पाचारण करण्यात आले हाेते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. --नकली दागिन्यांना हातही लावला नाहीदुकानातून १५ ते १६ किलो चांदीचे दागिने लांबविले. पैंजण, जोडव्यांचा पळवलेल्या दागिन्यात समावेश आहे. तसेच ३०० ते ३५० ग्रॅम सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. हे करीत असताना नकली सोन्याच्या दागिन्यांना चोरट्यांनी स्पर्शही केला नाही.----घटनास्थळी आमदारही ..घटनास्थळी आमदार राम सातपुते यांनी भेट देऊन संबंधीत सराफाशी चर्चा करुन पोलिस अधिका-यांना चोरीचा तपास तातडीने लावण्यास सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरRobberyचोरी