शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

माहिती अधिकाराच्या शस्त्राने हळदुगेंच्या पोपट नलावडेंनी ठेवले अख्खे गाव धाकात, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 19:50 IST

माहितीच्या अधिकाराखाली दररोज गावात कुणाला ला कुणाला धमक्या देण्याची सवय असलेला हळदुगे (ता. बार्शी) येथील पोपट शामराव नलावडे हा ६७ वर्षीय निरक्षर इसम बुधवारी भर न्यायालयात कुºहाड घेऊन आल्याने अख्खे न्यायालय हादरून गेले.

ठळक मुद्देशरीराने दणकट असलेल्या पोपट नलावडेने भर न्यायालयात कुºहाड दाखवल्याने अनेकांना धडकीलिहिता वाचता येत नाही असे निरक्षर लोकही माहिती अधिकाराच्या नावाखाली धमक्या देऊ लागल्याचे चित्रतात्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशीही याने हमरी तुमरीची भाषा केली होती

बाळासाहेब बोचरेसोलापूर दि २१ : समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनतेला माहितीचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून धरणे अािण उपोषण केले . माहितीच्या अधिकाराचा आज काही साक्षर लोक दुरूपयोग करतात हे जरी खरे असले तरी ज्याला लिहिता वाचता येत नाही असे निरक्षर लोकही माहिती अधिकाराच्या नावाखाली धमक्या देऊ लागल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकाराखाली दररोज गावात कुणाला ला कुणाला धमक्या देण्याची सवय असलेला हळदुगे (ता. बार्शी) येथील पोपट शामराव नलावडे हा ६७ वर्षीय निरक्षर इसम बुधवारी भर न्यायालयात कुºहाड घेऊन आल्याने अख्खे न्यायालय हादरून गेले.वय झाले तरी शरीराने दणकट असलेल्या पोपट नलावडेने भर न्यायालयात कुºहाड दाखवल्याने अनेकांना धडकी भरली. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या गावी जावून अनेकांकडे चौकशी केली असता त्याने धमकी देण्यासाठी गावातल्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, पत्रकार यापैकी कोणालाच सोडले नसल्याचे समजले. सगळ्यानाच तो माहिती अधिकाराची धमकी देत असतो. या निरक्षर माणसाला माहिती अधिकाराचे महत्व कसे कळले आणि मिळालेली माहिती वाचता तरी येते की नाही हा मुद्दा बाजुला असला तरी त्याचा शस्त्र म्हणून तो मोठ्या खुबीने वापर करतो. एक विक्षिप्त माणूस अशीच याची गावात वल्गणा केली जाते. त्याच्या वाटेला कोणी जात नाही. याला दोन मुले आणि एक मुलगी असून सर्वजण विवाहित आहेत. याच्याजवळ फक्त याची पत्नी असून ती मोलमजुरी करते. कायम हातात कुºहाड, काठी , कोयता असे कोणतेही शस्त्र बाळगणे, आणि कोणत्याही कारणास्तव धमक्या देणे, धडा शिकवण्याची भाषा करणे अशी त्याला सवयच आहे. मात्र अद्याप त्याने कोणावरही हल्ला केला नाही. गावकरीच त्याच्यापासून चार हात दूर राहतात. पाच- सहा वर्षापूर्वी त्याने बार्शी न्यायालयातही कुºहाड दाखवल्याने त्याला दोन वेळा तीन महिन्याची सजा झाली होती. लोकशाही दिनामध्ये तात्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशीही याने हमरी तुमरीची भाषा केली होती. -----------एक खटला असाही....गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीशेजारी विहीर घेण्यास शेतकºयांना बंदी असते. तरीही पोपट नलावडेने विहीर पाडल्याने ग्रामपंचायतीने त्याची विहीर बुजवली आणि मोटार जप्त केली. त्याविरुध्द त्याने दावा केला आहे. आता मला नुकसान भरपाई मिळणार या स्वप्नात तो असून त्यासाठी स्वत:ची १२ एकर जमीन पडीक ठेवली आहे. 

निरक्षर पोपट नलवडेला कळले माहिती अधिकाराचे मर्म 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस