शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सोलापूरात जिल्ह्यात गुंठेवारी कारवाईसह खरेदी-विक्रीतून विक्रमी २६० कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 11:01 IST

राकेश कदम सोलापूर : नोटाबंदीनंतर दीड वर्षे थंडावलेला खरेदी-विक्री व्यवहार काही प्रमाणात रुळावर आला आहे. जिल्हा मुद्रांक कार्यालयाला २०१७-१८ या आर्थिक वर्षात मुद्रांक फी आणि नोंदणी शुल्काच्या माध्यमातून २६० कोटींचा महसूल मिळाला आहे. ही रक्कम शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ५ कोटी रुपयांनी जास्त असून, आठ वर्षांतील विक्रमी आहे. वसुलीमध्ये खरेदी-विक्री व्यवहारांबरोबरच भाडेकरार, ...

ठळक मुद्देजिल्ह्यात दुय्यम निबंधकांची १६ कार्यालये आहेत२०१६-१७ साली जिल्हा मुद्रांक कार्यालयाला २७१ कोटींचे उद्दिष्टथंडावलेला खरेदी-विक्री व्यवहार काही प्रमाणात रुळावर आला

राकेश कदम सोलापूर : नोटाबंदीनंतर दीड वर्षे थंडावलेला खरेदी-विक्री व्यवहार काही प्रमाणात रुळावर आला आहे. जिल्हा मुद्रांक कार्यालयाला २०१७-१८ या आर्थिक वर्षात मुद्रांक फी आणि नोंदणी शुल्काच्या माध्यमातून २६० कोटींचा महसूल मिळाला आहे. ही रक्कम शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ५ कोटी रुपयांनी जास्त असून, आठ वर्षांतील विक्रमी आहे. वसुलीमध्ये खरेदी-विक्री व्यवहारांबरोबरच भाडेकरार, गुंठेवारीसंदर्भात केलेल्या कारवाईचा महत्त्वाचा वाटा असल्याचा दावा मुद्रांक जिल्हाधिकारी साहेबराव दुतोंडे यांनी केला आहे. 

जिल्ह्यात दुय्यम निबंधकांची १६ कार्यालये आहेत. येथे खरेदी-विक्रीसह भाडेकरारांची नोंद केली जाते. दोन वर्षांपूर्वी मोदी सरकारने नोटाबंदी केली होती. जिल्ह्यातील खरेदी-विक्री व्यवहारांवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. २०१६-१७ साली जिल्हा मुद्रांक कार्यालयाला २७१ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले होते. गेल्या सहा महिन्यात बाजार रुळावर येत आहे. व्यवहारांवर परिणाम झाल्यामुळे मुद्रांक कार्यालयाने गुंठेवारी, भाडेकरार याकडे लक्ष वळविले.

गुंठेवारी, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतील गाळ्यांच्या भाडेकरार प्रकरणात मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क बुडविले जाते. यासंदर्भात नोटिसा बजावून वसुली करण्यात आली. यात सोलापूर कृषी बाजार समितीमधील गाळे, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूरसह इतर नगरपालिका हद्दीतील गाळ्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मुद्रांक विभागाने काही प्रकरणांत मुद्रांक आणि नोंदणी फीचा बोजा इतर हक्कामध्ये नोंदविला होता. त्याच्या वसुलीसाठी संबंधित पक्षकारांना बोलावून वसुली करण्यात आली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात मुद्रांक कार्यालयाला २५५ कोटींचे उद्दिष्ट दिले. २६० कोटींचा महसूल मिळाला आहे. मागील आठ वर्र्षांतील ही विक्रमी वसुली आहे. 

रेडिरेकनरमध्ये बदल नाही१ एप्रिलपासून नवे रेडिरेकनर लागू होतात. परंतु यावर्षी रेडिरेकनरमध्ये बदल झालेला नाही. आठ वर्षांच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये विक्रमी ७६,६९९ दस्त झाले आहेत. यावर्षी गॅस एजन्सी धारकांकडूनही वसुली करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीतील गुंठेवारी प्रकरणासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविली. मुद्रांक शुल्क चुकल्यास आता ग्रामसेवकावरच कारवाई होणार आहे. ग्रामसेवकांना प्रॉपर आॅफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. वसुली मोहीम यावर्षीही सुरूच राहणार आहे. - साहेबराव दुतोंडे, मुद्रांक जिल्हाधिकारी, सोलापूर. 

वर्ष    दस्तसंख्या    उद्दिष्ट (कोटी)    वसुली (कोटी)    टक्केवारी२०१०-११     ८५,९८४    ११५        ११२.३१    ९७.६६२०११-१२    ९३,२६४    १२५        १३२.०५    १०५.६४२०१२-१३    ८७,८८५    १४०        १५७.२३    ११२.३०२०१३-१४    ८५,६८२    २१०        १७१.६    ८१.७१२०१४-१५    ७६,९६६    १९२        १९५.२७    १०१.७०२०१५-१६    ७४,८२२    २२१        २१०.४३    ९५.२२२०१६-१७    ७२,८६५    २७१        २१६.७७    ७९.९८२०१७-१८    ७६,६९९    २५५        २६०    १०४        

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय