शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आरंभी शिल्लकीसह ५३ कोटी ५५ लाख रूपयांचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:02 IST

सांगोला नगरपरिषद अर्थसंकल्पी‍य सर्वसाधारण सभा पार पडली. सन २०२१-२२ साठी कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेल्या तसेच २०२०-२१ सुधारीत व सन ...

सांगोला नगरपरिषद अर्थसंकल्पी‍य सर्वसाधारण सभा पार पडली. सन २०२१-२२ साठी कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेल्या तसेच २०२०-२१ सुधारीत व सन २०२१-२२ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. लेखापाल जितेंद्र गायकवाड व लेखापरिक्षक विजयकुमार कन्हेरे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. सभेस नगराध्यक्षा राणी माने, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, विषय समित्यांचे सभापती व सर्व नगरसेवक, नगरसेविका, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

अर्थसंकल्पात आरंभीच्या शिल्लकीसह महसुली जमा व शासन अनुदाने सुमारे ५३ कोटी ५५ लाख ३७ हजार ४७० रूपये जमा बाजूस दर्शविण्यात आले आहेत. तर ५३ कोटी ५१ लाख ७० हजार ७०० रूपये इतका खर्च दर्शविण्यात आला आहे. तर ३ लाख ६६ हजार ७७६ रूपये शिल्लक दर्शविण्यात आले आहेत.

अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी

अर्थसंकल्पात कोरोना उपाययोजना करण्यासाठी भरीव तरतुद, १५ वा वित्त आयोग, नगरोत्थान जिल्हास्तर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधारणा योजना, दलितेत्तर योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना, अल्पसंख्यांक बहूल क्षेत्र विकास योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, रमाई आवास घरकुल योजना, श्रमसाफल्य योजना, अग्निसुरक्षा बळकटीकरण योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, राजीव गांधी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, बगीचे, इमारतींचे बांधकाम, स्मशानभूमी, दफनभूमी सुधारणा, नविन रस्ते व शहरातील रस्त्याची दुरुस्ती, नविन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, घनकचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदी, विद्युत साहित्य, नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा व क्लोवनेटर यंत्रणा बसविणे, विविध शासन योजनांची न.प. हिस्सा (लोकवर्गणी) भरण्यासाठी तरतुद, महिला बालकल्या‍ण, अपंग कल्याण व दुर्बल घटकांसाठी तरतुद, शहरामध्ये राष्ट्र पुरुषांचे व समाज सुधारकांचे नविन पुतळे बसविणे व सुशोभिकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी विशेष अनुदानामधून कचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने वर्गीकरण करुन त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे, गांडूळ खत प्रकल्पापासून निर्माण होणारे खत विक्री करुन नगरपरिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.