शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सेवानिवृत्तावर क्रीडा समन्वयकाची जबाबदारी; तक्रारीनंतर क्रीडा विभागाने केली नेमणूक रद्द

By appasaheb.patil | Updated: August 25, 2023 13:17 IST

शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सांगितले.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : करमाळा तालुका क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेसाठी सेवानिवृत्त शिक्षकाची क्रीडा समन्वयक म्हणून नियुक्ती केली होती. याबाबत शिक्षक भारती संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर मुकुंद साळुंखे यांची नेमणूक रद्द करून स्पर्धेच्या क्रीडा समन्वयकपदी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळ्याचे राम काळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी सांगितले.

करमाळा तालुक्यात चालू असणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा विभागाकडून केले जाते. या क्रीडा स्पर्धांचे आयोजक म्हणून मुकुंद साळुंखे यांची नेमणूक क्रीडा विभाग यांनी केली होती. ही नेमणूक करताना साळुंखे यांनी आपण सेवानिवृत्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली नव्हती. या नेमणुकीस शिक्षक भारती संघटना करमाळा यांनी आक्षेप नोंदवला होता. मुकुंद साळुंखे हे सेवानिवृत्त शिक्षक असल्याने त्यांना क्रीडा समन्वयक म्हणून काम पाहण्याचे अधिकार नाहीत, ही भूमिका शिक्षक भारतीने तक्रारीत मांडली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा क्रीडा अधिकारी मोरे यांनी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांच्याकडे मुकुंद साळुंखे यांची नेमणूक रद्द करून नवीन क्रीडा समन्वयक यांच्या नेमणुकीचे पत्र दिले.

टॅग्स :Solapurसोलापूर