शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात निवासी डॉक्टरांचा संप सुरुच

By admin | Updated: March 24, 2017 14:49 IST

सोलापुरात निवासी डॉक्टरांचा संप सुरुच

सोलापुरात निवासी डॉक्टरांचा संप सुरुचसोलापूर: आम्ही जनतेसोबत आहोत... आमचा लढा सरकारच्या उदासीन धोरणाविरुद्ध आहे रुग्णांविरुद्ध नव्हे.. रुग्णांसाठी सोयीसुविधांसाठी अपुरी साहित्य सामुग्री त्यातून डॉक्टर- रुग्ण, नातलगांमध्ये निर्माण होणारे तणाव आणि कटूतेचे वातावरण जनतेसमोर दर्शविण्यासाठी तीन दिवसांपासून संपावर असलेल्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर पथनाट्यातून हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर संप सुरु आहे. यासंबंधी मार्डने संप मागे घेतल्याचे वृत्त सर्वत्र झळकत असताना सोलापुरातील निवासी डॉक्टरांचा मात्र आजही दिवसभर संप सुरु होता. दुपारी १२ च्या सुमारास डॉ. पंकज नंदागवळी यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर पथनाट्यातून जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली. सकाळी निवासी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर पथनाट्य सादर करण्यासाठी परवानगी मागण्यात आली; मात्र अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी संबंधित ११२ डॉक्टरांचे निलंबन केल्यामुळे परवानगी नाकारली. यामुळे डॉक्टरांनी शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर आपले आंदोलन छेडून शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध केल्याचे डॉ. पंकज नंदागवळी यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.आमचा लढा हा शांततेच्या मार्गाने असून, त्याचे प्रतीक म्हणून सायंकाळी रुग्णालयातील बी ब्लॉक ते बाह्यरुग्ण विभागापर्यंत कँडल मार्च केल्याचे डॉ. प्रदीप हुलके यांनी स्पष्ट केले. यावेळी समन्वयक डॉ. पंकज नंदागवळी, डॉ. प्रफुल्ल हुलके, डॉ. श्याम गिरी, डॉ. श्रद्धा महाडिक, डॉ. जयदीप दळवी, डॉ. बालाजी माने, डॉ. अक्षय शिंदे यांच्यासह निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)