शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

आयुक्त गुडेवार यांची बदली; विरोधक रस्त्यावर

By admin | Updated: June 22, 2014 00:23 IST

शासनाचा निषेध : विविध पक्ष, संघटनांच्या वतीने निदर्शने

सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याच्या कारणावरून बहुजन समाज पार्टी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आदी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. नेत्यांनी शासनाचा निषेध करीत सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. आयुक्त गुडेवार यांची पुन्हा त्यांच्या मूळच्या खात्यात बदली झाली आहे. सोमवारी मंत्रालयातून यासंबंधीचे आदेश निघण्याची शक्यता आहे. या वृत्ताला स्वत: गुडेवार यांनीही दुजोला दिला होता. ही बातमी वृत्तपत्रात येताच शनिवारी विविध राजकीय पक्षांनी आंदोलन केले. बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हलगी नाद आंदोलन करण्यात आले. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरो आंदोलन करून शासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. चंद्रकांत गुडेवार यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी नियमात राहून काम करीत असताना केवळ राजकीय नेत्यांच्या दबावामुळे त्यांच्या बदलीचा घाट घालण्यात आला आहे. स्थानिक आमदार आणि सत्ताधारी नेत्यांनी जाणीवपूर्वक गुडेवार यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बहुजन समाज पार्टी हा अन्याय कदापी सहन करणार नाही, त्यांची बदली रद्द झाली पाहिजे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी आनंद चंदनशिवे यांनी दिला. यावेळी नगरसेविका उषा शिंदे, सुनीता भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शहर शिवसेनेच्या वतीने महापौर अलका राठोड यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहरप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर ,विष्णू कारमपुरी, शाहू शिंदे, सुनील शेळके, संतोष पाटील, संजय कणके, सहदेव येलुरे, सुनील कामाठी, भीमाशंकर म्हेत्रे आदी सामील झाले होते. डी.वाय.एफ.आय.च्या वतीनेही महापौर कक्षासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काही कार्यकर्त्यांनी महापौर कक्षातील खुर्च्या फेकून आपला राग व्यक्त केला. भाजपा नगरसेवकांनी पार्टी बैठक घेऊन शासनाच्या बदली आदेशाचा निषेध केला. यावेळी नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. मनपा कामगार संघटना कृती समितीच्या वतीनेही निदर्शने करण्यात आली. गुडेवार यांची नियुक्ती होऊन एक वर्षही झाले नाही तोवर त्यांची तडकाफडकी बदली करण्याची ही दुसरी वेळ आहे. गुडेवार यांची बदली म्हणजे सोलापूरकरांच्या अपेक्षांना धक्का देणारी बाब आहे त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी अन्यथा दि.२३ जूनपासून तीव्र आंदोलनाचा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला आहे. संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फॅक्सद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.