शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काळात प्रशासकीय कार्यालयातील कामे नियमित सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 13:08 IST

कोणीही बाऊ करू नये; जिल्हाधिकाºयांनी दिल्या अधिकाºयांना सूचना

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींनी शासनाच्या निधीतून केलेल्या विकास कामांबाबत शहरात लावलेले फलक कागद डकवून झाकण्याचे काम सुरू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने ७ लोकांवर एमपीडीए (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याखाली स्थानबद्ध), ३६ जणांना तडीपार केलेनिवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासकीय कामकाज नाही किंवा निवडणुकीचे काम आहे असे सांगून अनेक कार्यालये ओस पडलेली असतात.

सोलापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली तरी प्रशासकीय कार्यालयातील व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत राहतील. कोणत्याही अधिकाºयांनी निवडणुकीचा बाऊ करू नये अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर आचारसंहितेचा अंमल सुरू झाला आहे. या काळात काय करावे व काय करू नये याची नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत राहतील. कामासाठी येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकाºयांनी घ्यायची आहे. 

निवडणूक कामासाठी घेण्यात येणाºया कर्मचाºयांना त्यांचे काम संपल्यानंतर मूळ ठिकाणच्या जबाबदाºया पार पाडावयाच्या आहेत. नियमित कामे व फायली प्रलंबित राहणार नाहीत, नागरिकांना विनाकारण हेलपाटे घालावे लागणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. 

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासकीय कामकाज नाही किंवा निवडणुकीचे काम आहे असे सांगून अनेक कार्यालये ओस पडलेली असतात. नागरिकांना संबंधित टेबलाचा कर्मचारी नेमका कुठे गेला आहे हे समजत नाही. त्याचबरोबर अनेक कर्मचारी आता निवडणूक संपल्यावर या अशी कारणे सांगताना दिसून येतात. दररोजच्या गरजेच्या कामांसाठी निवडणूक आचारसंहितेचा बाऊ करू नये असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भोसले यांनी म्हटले आहे. 

पोलिसांच्या कारवाया सुरू- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने ७ लोकांवर एमपीडीए (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याखाली स्थानबद्ध), ३६ जणांना तडीपार केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. शहरात ५६४ शस्त्र परवानाधारक आहेत, त्यांना शस्त्र जमा करण्यास सांगितले आहे. जिल्ह्यात ५२ टोळीतील लोकांना हद्दपार तर १२८ जणांना तडीपार केले आहे अशी माहिती अपर अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. ८५९४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  शस्त्र परवानाधारक १२६0 जण असून, त्यांना शस्त्र जमा करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.

फलकांवर डकविले कागद- लोकप्रतिनिधींनी शासनाच्या निधीतून केलेल्या विकास कामांबाबत शहरात लावलेले फलक कागद डकवून झाकण्याचे काम सुरू केले आहे. नजरेतून सुटलेल्या जाहिराती व फलक महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून सोमवारी काढून टाकण्यात येणार आहेत. शासकीय विश्रामधाम राजकीय व्यक्तींसाठी बंद करण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा