शेवटच्या तीन दिवसात होणार विक्रमी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:23+5:302020-12-29T04:21:23+5:30

जैनवाडी ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक करत इतर ग्रामपंचायतींसमोर ठेवलेला आदर्श घेत देवडे, पुनर्वसन आदी ग्रामपंचायतींची वाटचालही बिनविरोधकडे सुरू आहे. ७२ ...

Record applications will be filed in the last three days | शेवटच्या तीन दिवसात होणार विक्रमी अर्ज दाखल

शेवटच्या तीन दिवसात होणार विक्रमी अर्ज दाखल

Next

जैनवाडी ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक करत इतर ग्रामपंचायतींसमोर ठेवलेला आदर्श घेत देवडे, पुनर्वसन आदी ग्रामपंचायतींची वाटचालही बिनविरोधकडे सुरू आहे. ७२ ग्रामपंचायतींसाठी अनेक गावांमध्ये दुहेरी, तिहेरी लढती होण्याची शक्यता आहे. सुट्टीच्या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक गावात नाराजांची मनधरणी करत आपापल्या पॅनलला कसा फायदा होईल, यासाठी प्रत्येक गटाची धावपळ सुरू होती. मात्र तरीही अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करणारच या भूमिकेत असल्याने तालुका पातळीवरील नेतृत्वासमोर हा विषय मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

पहिल्या तीन दिवसात ७२ ग्रामपंचायतींसाठी १०० अर्ज दाखल झाले. सुट्टीच्या तीन दिवसांच्या कालावधीत प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याच्याच प्रती अधिकृतपणे निवडणूक निर्णय विभागाकडे देण्यासाठी सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवसात मोठी गर्दी होणार असल्याचे संकेत आहेत.

जैनवाडीनंतर आणखी ग्रामपंचायती बिनविरोधच्या मार्गावर

जैनवाडी (ता. पंढरपूर) या ग्रामपंचायतीने मागील ४० वर्षांची परंपरा खंडित करत ग्रामस्थांनी सर्वानुमते ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करत तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर नवा आदर्श घालून दिला आहे. त्यानंतर आता देवडे, पुनर्वसन गावठाण (पटवर्धन कुरोली) आदी ग्रामपंचायतींचीही बिनविरोधकडे वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील आणखी किती ग्रामपंचायती शेवटपर्यंत बिनविरोध होतात, याची उत्सुकता लागली आहे. तोपर्यंत प्रशासन तालुका स्तरावरील नेते व गावातील प्रमुख त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

शासनाच्या नव्या जीआरमुळे अनेकांचा हिरमोड

ग्रामपंचायत म्हटले की गावागावात उमेदवारांची भाऊगर्दी असते; मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणूक लढविलेल्या उमेदवाराला निवडणूक आयोगाने खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी दिला होता. त्या कालावधीतही त्या विजयी झालेल्या किंवा पराभूत झालेल्या उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे खर्चाचा तपशील सादर केला नाही म्हणून यावर्षी निवडणूक आयोगाने नवीन जीआर काढत मागील निवडणुकीतील ज्या उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही, त्यांना निवडणूक लढविता येणार नाही, असा आदेशच काढल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे ते आता आपल्या घरातील इतर उमेदवार देता येतील का याची चाचपणी करत आहेत.

Web Title: Record applications will be filed in the last three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.