शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीचे औचित्य; मुस्लिम बांधवांनी काढलेल्या एकता रॅलीने वेधले सोलापूरकरांचे लक्ष

By appasaheb.patil | Updated: February 19, 2024 17:24 IST

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरने हा आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सोलापूर : रॅलीत सर्वात पुढे तिरंगा हाती घेऊन घोडेस्वार.. त्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मुस्लिम सरदार मावळ्यांचे नाव आणि पद उल्लेख केलेले फलक हाती घेतलेले युवक...सर्वधर्मसमभावचा संदेश देणारे मुस्लिम बांधवांनी यंदाच्या वर्षीही शिव एकता रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरने हा आगळावेगळा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर आरिफ शेख, माजी उपमहापौर नानासाहेब काळे, राजन जाधव, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, मातंग समाज शहराध्यक्ष युवराज पवार भटक्या विमुक्त जमाती अध्यक्ष प्रा विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस सुरुवात करण्यात आली. सदर रॅली विजापूर वेस मार्गे नवी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जन करण्यात आली. यावेळी बेगम पेठ येथे अल्ताफ लिंबूवाले इम्तियाज कमिशनर यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.

विजापूर वेस येथे बागवान जमातीच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. नवी पेठेत व्यापारी विजय भोईटे, सिताराम लांडे यांनी स्वागत केले. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे पोपट भोसले, प्रा.संजय जाधव प्रा. यादव अल्ताफ लिंबूवाले, इम्तियाज कमिशनर, जुबेर कुरेशी, युन्नुसभाई डोणगावकर, तन्वीर शेख, रियाज पैलवान, नईम करनूल, तन्वीर गुलजार, बशीर सय्यद, मुबिन सय्यद, राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, रिजवान शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरShivjayantiशिवजयंती