शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रिअ‍ॅलिटी Check; नागरिकांना हेल्मेटची तर पोलिसांना मास्कची अ‍ॅलर्जी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 12:11 IST

दोन्ही नियम धाब्यावर; कोरोना संसर्गाची चिंता नाही; नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्नदुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी सायंकाळी जारी केलेगेल्या काही दिवसांपासून दुचाकीवर डबलसीटला परवानगी देण्यात आली

सोलापूर : संचारबंदी उठल्यानंतर शहरात पुन्हा रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले मास्क काही लोक घालतात तर काही लोक तसेच फिरत आहेत. क्वचित काही लोकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत आहे. त्यामुळे ना मास्क.. ना हेल्मेट.. सोलापुरात दुचाकीस्वार बिनधास्त असं चित्र पहावयास मिळत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. २३ मार्च रोजी सोलापुरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर हळूहळू संचारबंदी उठविण्यात आली. दि. १६ ते २६ जुलैदरम्यान पुन्हा कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. दि. २७ जुलैपासून वाहनांना परवानगी देण्यात आली. 

दुचाकी वाहनावर फक्त एकाच व्यक्तीला प्रवास करता येत होता. गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवर डबलसीटला परवानगी देण्यात आली आहे, मात्र दोघांनीही मास्क आणि हेल्मेट घातले पाहिजे, अशी अट घालण्यात आली आहे. संचारबंदी उठली म्हणून आता सोलापूरकर घराबाहेर बिनधास्तपणे पडत आहेत. मोटरसायकलवरून फिरणारी बरीच मंडळी मास्क न घालता बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून आले. 

हेल्मेट असेल तर मास्कची सक्ती का?पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढलेल्या आदेशाप्रमाणे काही दुचाकीस्वार प्रामाणिकपणे हेल्मेट परिधान करतात, तोंडाला मास्क लावतात मात्र यामुळे त्रास होतो. श्वास घेण्यासाठी त्रास होतो, सतत मास्क व हेल्मेट वापरल्यामुळे बांधल्यासारखं होतं. मोटरसायकल चालवताना अवघडल्यासारखं होतं. प्रशासनाने तूर्तास कोरोनाचे संकट टळेपर्यंत हेल्मेटची सक्ती करू नये. हेल्मेट सक्ती असेल तर त्याला मास्कची सक्ती करू नये, अशा प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.

मास्कमुळे दम लागतो...हेल्मेट आणि मास्क या दोन्ही गोष्टी तोंडाला आणि डोक्याला लावून घराबाहेर पडायचं म्हटलं तर खूप जीवावर येतं. मोटरसायकल चालवताना चौफेर नजर राहत नाही. मास्कमुळे दम लागल्यासारखे होते, असे मत रेल्वे कर्मचारी समाधान कोळी यांनी व्यक्त केले.

हेल्मेट, मास्क न घातल्यास आता कारवाईसोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असताना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. राखी पौर्णिमेनिमित्त दुचाकीस्वार विनाहेल्मेट मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्याचे दिसून आल्यावर आता अशा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी सायंकाळी जारी केले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, चेहºयावर मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाक, डोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये दुचाकीवर दोघे हेल्मेट व मास्कसह, तीनचाकी वाहनात चालक व इतर दोन, चारचाकी वाहनात चालक व इतर तिघे आणि रिक्षात चालक व इतर तिघांना परवानगी असेल, असा आदेश काढण्यात आला आहे.

प्रवाशांच्या संरक्षणासाठी हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. मोटरसायकल चालवणाºया व्यक्तीने हेल्मेट परिधान केलेच पाहिजे. हेल्मेटने पूर्ण तोंड झाकलं जात असेल तर त्याला मास्क लावण्याची गरज नाही. पाठीमागे बसणाºया व्यक्तीने मास्क लावावा. विनाहेल्मेट फिरणाºयांवर कारवाई होणारच. -बाळासाहेब भालचिम,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या