शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इंडीचे माजी आमदार रवी पाटील यांचे सोलापूरातील हॉटेल बांधकाम बेकायदेशीरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:45 IST

जिल्हा न्यायालयाने फेटाळले अपील : उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत

ठळक मुद्देआठ मजली बांधकाम बेकायदेशीर ठरवणारा महापालिकेचा आदेश योग्यतत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ३ मार्च २०१४ रोजी त्या बांधकामाची परवानगी रद्द केली होती

सोलापूर : सात रस्ता परिसरात  हॉटेल बांधकामासाठी इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांनी केलेले आठ मजली बांधकाम बेकायदेशीर ठरवणारा महापालिकेचा आदेश योग्य ठरवत यास आव्हान देणारी याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नाहरकत न घेता व अटींची पूर्तता न करता पाटील यांनी ८ मजल्यापर्यंत हॉटेलचे बांधकाम केले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ३ मार्च २०१४ रोजी त्या बांधकामाची परवानगी रद्द केली होती.

त्याचप्रमाणे २२ मे २०१४ रोजी बांधकाम बेकायदेशीर असल्याने पाडण्याची नोटीस दिली होती. या नोटीशीला  हॉटेलचे मालक रवी पाटील यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले होते.. दोन्ही बाजूंचा पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश शेंडगे यांनी तो दावा खर्चासह रद्द केला. त्या निकालाविरुध्द पाटील यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले होते. 

१६ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी रविकांत पाटील यांचे अपील रद्द करुन कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम केला. महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या नोटिसा योग्य व कायदेशीर आहेत, असे ग्राह्य धरले.

रविकांत पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. ए. डी. वसगडेकर यांनी महानगरपालिकेने १५ एप्रिल २००८, १६ नोव्हेंबर २०११, ३१ मे २०१३ रोजी बांधकाम परवाना दिल्याचे पाटील यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधकाम केले व तत्कालीन आयुक्त यांनी पूर्वग्रहदूषित होऊन नोटिसा दिल्याचा युक्तीवाद केला. 

लपवून परवाना मिळविल्याचा युक्तिवाद- मूळ मालकाने राष्ट्रीय महामार्ग जातो, ही बाब जाणूनबुजून लपवून परवाना मिळवला, ही बाब बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. एस. आर. पाटील यांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला. 

दूध डेअरीसमोरील हॉटेलच्या बांधकामप्रकरणी मालकाने महापालिकेविरुद्ध जिल्हा न्यायालयात केलेले अपील फेटाळले आहे. महापालिकेच्या बाजूने हा निकाल असला तरी यात मालकास निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाण्यास मुदत दिली आहे व तोवर जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.-संदीप कारंजे, नगरअभियंता, महापालिका 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाCourtन्यायालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस