शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राऊत गटाच्या आघाडी स्थानिक आघाड्यांचे ११ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:24 IST

विजयानंतर राऊत गटाने ५१ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा केला आहे़ येथील उपळाई रोडवरील शासकीय गोदामामध्ये सकाळी ८ वाजता ...

विजयानंतर राऊत गटाने ५१ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा केला आहे़ येथील उपळाई रोडवरील शासकीय गोदामामध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिला निकाल हा कांदलगाव ग्रामपंचायतीचा लागला. यामध्ये सुधाकर फुरडे यांच्या नेतृत्वाखालील लक्ष्मी नृसिंह ग्रा़ वि. आघाडीने सहापैकी चार जागा जिंकत सत्ता कायम राखली़ चाळीस वर्षांत प्रथमच निवडणूक लागलेल्या मळेगावमध्ये विद्यमान सरपंच गुणवंत मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पंचायत समिती सदस्य राजाभाऊ धोत्रे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत सर्व नऊ जागा मोठ्या मतांच्या फरकाने जिंकल्या़ नागोबाचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये अजित बारंगुळे व विष्णू बारंगुळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नऊच्या नऊ जागा जिंकत प्रहार संघटनेच्या संजीवनी बारंगुळे गटास पराभूत केले. पाथरीमध्ये नानासाहेब गायकवाड गटाने सातपैकी सात जागा जिंकल्या़ चारेमध्ये सोपल गटाचे पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते सुंदरराव जगदाळे यांनी राऊत गटाच्या जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते संजय पाटील गटाने सात जागा जिंकत सत्ता खेचून आणली़ प्रशांत जगदाळे हे केवळ एका मताने विजयी झाले़ पाटील गटाला दोन जागा मिळाल्या़

पांगरीमध्ये निवडणूक लागलेल्या सर्व नऊ जागा पाटील व आमदार गटाच्या अ‍ॅड. अनिल पाटील, सुहास देशमुख, विजय गरड यांच्या पॅनलने जिंकत सोपल गटाकडून सत्ता ताब्यात घेतली़ बावीमध्ये पिंटू लोंढे व समाधान डोईफोडे यांच्या गटाने नऊपैकी सहा जागा जिंकल्या़ गूळपोळीत पंचायत समितीचे विद्यमान सदस्य इंद्रजित चिकणे गटाचा पराभव करीत श्रीकांत मचाले, रामहरी काळे गटाने नऊच्या नऊ जागा जिंकत चिकणे गटाला धक्का दिला़ भातंबरेमध्ये पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद वाघमोडे गटाने ११ पैकी सहा जागा जिंकत सत्ता कायम ठेवली़ आगळगावात गरड बंधू, उकिरडे, थिटे, डमरे यांच्या विठ्ठल-रुक्मिणी ग्रामविकास पॅनलने जि.प. किरण मोरे व डमरे-जाधव गटाचा पराभव करीत नऊ जागा जिंकल्या़ कासारवाडीत जितेंद्र गायकवाड यांच्या सीताराम महाग्रामविकास आघाडीने सातपैकी पाच जागा जिंकल्या़ तर चिखर्डेत अमित कोंढारे व प्रकाश पाटील, संदेश देवकर यांच्या येडेश्वरी ग्रा़ वि. आघाडीला सर्व ११ जागा मिळाल्या़ त्यांनी सत्ता खेचून आणली़ याठिकाणी अण्णासाहेब कोंढारे व भगवंत पाटील यांचा पराभव झाला़

अलीपूरमध्ये अशोक मुंंढे गटाच्या चार तर सुरेश कसबे गटाच्या तीन जागा आल्या़ यामध्ये आजवर सहा वेळा विजयी झालेले सुरेश कसबे सातव्या निवडणुकीत मात्र पराभूत झाले़ पिंपरी सा़ मध्ये आ़ राऊत गटाचे चेतन काशीद यांनी माजी पंचायत समिती सदस्य भास्कर काशिद गटाचा पराभव करून सत्ता खेचून आणली़ पिंपळवाडीत अन्नपूर्णा ग्रामविकास आघाडीने सातपैकी पाच जागा जिंकल्या़ ढोराळेमध्ये राऊत गटाच्या बाळोजीबाबा विकास आघाडीला सात जागा मिळाल्या़ धामणगाव दुु. मध्ये माजी आ़ दिलीप सोपल गटाचे एस.के. पाटील गटाने सहा जागा जिंकत सत्ता मिळवली़ याठिकाणी मिरगणे गटाच्या नाना पाटील यांना दोन तर राऊत गटाच्या महेश बोधले यांना तीन जागा मिळाल्या़ कुसळंबमध्ये राऊत गटाच्या श्री दत्त ग्रामविकास आघाडीला पाच जागा मिळाल्या़ तर सोपल गटाला चार जागा मिळाल्या़ आळजापुरामध्ये सोपल गटाने चार जागा जिंकल्या़ शेंद्रीमध्ये युवा ग्रा़ वि. आघाडीने सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकत राष्ट्रवादीचे महेश चव्हाण गटाचा धुव्वा उडवला़ कळंबवाडी आ़ मध्ये खुशाल मुंढे व राजाभाऊ उमाप गटाने पोपट पवार गटाचा पराभव केला़

नांदणीत सर्वपक्षीय आघाडीला सहा तर विरोधी पंचकृष्ण ग्रामविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला़ साकतमध्ये सागर मोरे यांच्या ग्रामविकास आघाडीने नऊपैकी सहा जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले़ तुर्कपिंपरीमध्ये पिरसाहेब ग्रा़ वि. आघाडीने सातपैकी सहा जागा जिंंकल्या़ बोरगावमध्ये ईश्वर जाधवर व लक्ष्मण जाधवर गटाने चार जागा जिंकल्या़ तर विरोधी आघाडीने तीन जागा जिंकल्या़ कोरफळेत माजी जि.प. उपाध्यक्ष कौरव मान सहा तर विरोधी गटाला पाच जागा मिळाल्या. तडवळेत रामकृष्ण लोखंडे यांच्या यशवंत ग्रा.वि. आघाडीने वर्षकेतू जाधव व मेजर आवारे यांचा सहा जागा घेत पराभव केला़ ममदापूरमध्ये तुळजाभवानी ग्रा़ वि. पॅनलने सातपैकी सात जागा जिंकत विजयी हॅट् ट्रिक केली़ भोइंजेमध्ये शिवशंभू ग्रा.वि. आघाडीने सहा जागा जिंकल्या़ तर साराळेत बाळराजे गाटे गटाच्या नऊपैकी आठ जागा जिंकल्या़

महागावात जय हनुमान महाविकास आघाडीने पाच जागा जिंकून सत्ता मिळवली़ वालवडमध्ये अ‍ॅड. सुभाष जाधवर गटाने सातपैकी पाच जागा जिंकल्या़ धानोरोमध्ये पंचायत समिती सुमंत गोरे यांच्या येमाईदेवी ग्रा़ वि. आघाडीला सातपैकी सहा जागा मिळाल्या़ काटेगावात सुरेश गाढवे व दगडू पटेल या ग्रा.वि. परिवर्तन आघाडीला सात जागा मिळाल्या़ खांडवीत गणेश बारंगुळे व रंगनाथ ठाकरे यांच्या खंडेश्वर ग्रा.वि. आघाडीला अकरापैकी सहा जागा मिळाल्या़ जामगाव आ़ मध्ये बाळासाहेब जगताप व विष्णू आवटे यांच्या पॅनलला सहा तर बाळराजे जाधव गटाला तीन जागा मिळाल्या़ सौंदरेमध्ये पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या़, तर चार जागांमध्ये महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला़ भालगावात जि.प. सदस्य तथा भाजपचे तालुकाध्यक्ष मदन दराडे यांच्या पॅनलने अनिल घुगे व दादा जाधवर गटाचा धुव्वा उडवत नऊच्या नऊ जागा जिंकून सत्ता ताब्यात ठेवली़

कोरेगावात नाना ढाकणे यांच्या अंबिका ग्रा़ वि. पॅनलनेही सातपैकी सात जागा जिंकल्या़ शेळगाव आरमध्ये सुरेश अडसूळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ पैकी सहा जागा जिंकल्या़ याठिकाणी बाजार समितीचे संचालक वासुदेव गायकवाड व बाबा गायकवाड गटाचा पराभव झाला़ सासुरे येथे महांकाळेश्वर ग्रा.वि. आघाडीच्या तात्यासाहेब करंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने नऊच्या नऊ जागा जिंकल्या़ याठिकाणी मा़ पं.स. सदस्या सुरेखा करंडे व त्यांचे पती माजी सरपंच ब्रह्मदेव करंडे या दोघा पतीपत्नीचा पराभव झाला़ फफाळवाडी-गाताचीवाडी ग्रुपग्रामपंचायतीतही विद्यमान सरपंच काकासाहेब फपाळ यांच्या गटाने नऊ जागा जिंकत सत्ता कायम राखली़ घाणेगावात बाजार समितीचे उपभापती झुंबर जाधव व पाटील गटाला सात तर नितीन मोरे गटाला दोन जागा मिळाल्या़ नारीत केशव घोगरे-रानमाळ यांच्या श्रीराम पॅनलला ११ पैकी आठ जागा मिळाल्या़ इर्लेवाडीत श्री विठ्ठल ग्रा़ वि. आघाडीला दोन निवडणुका झालेल्या जागा जिंकून विजय संपादन केला़ धस पिंपळगावात माजी जि.प. सदस्य हनुमंत धस यांच्या कै़ हरीनाना धस पिंपळगाव ग्रा़ वि. आघाडीने नऊच्या नऊ जागा जिंकून वर्चस्व अबाधित ठेवले़ पिंपरी सा़ मध्ये राऊत गटाच्या चेतन काशीद यांनी चेतन काशीद यांच्या गटाला सहा तर भास्कर काशीद गटाला तीन जागा मिळाल्या़ श्रीपत पिंपरीमध्ये भारत ताकभाते व बाळराजे पाटील यांच्या गटाला सात तर बाळासाहेब काकडे व कन्हैया पाटील यांच्या गटाला चार जागा मिळाल्या़ यात भारत ताकभाते यांचा मात्र पराभव झाला़

उक्कडगावात श्रीपती घुले यांच्या भगवानबाबा ग्रा.वि. आघाडीला नऊपैकी सहा जागा मिळाल्या़ मतमोजणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली पो.नि. संतोष गिरीगोसावी यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़

-----

चार उमेदवार ठरले चिठ्ठीद्वारे विजयी

मतमोजणी प्रतिनिधींची शहरातील राष्ट्रीय आरोग्य अभियान केंद्रातील आरोग्यसेविकांनी तापमान पाहून तपासणी केली़ त्यांना सॅनिटायझर लावूनच आतमध्ये सोडण्यात आले. हे चार उमेदवार चिठ्ठीद्वारे ठरले. या मतमोजणीत नागोबाचीवाडी-लक्ष्याचीवाडी ग्रुपग्रामपंचायतीमधील एका प्रभागातील रेखा चौरे, मंगल बनकर व अर्चना बनकर तीन उमेदवारांना समान मते पडली. यात चिठ्ठीद्वारे मंगल बनकर व अर्चना बनकर तर झरेगावात सरस्वती पोटभरे व कुसुम संकपाळ यांना समान ६४ मते मिळाली़ यांच्या चिठ्ठीत कुसुम संकपाळ विजयी ठरल्या़ बोरगाव खु. मध्ये विनोदकुमार उकिरडे व विशाल कांदे यांना प्रत्येकी २०७ मते मिळाली़ यात विशाल कांदे यांची चिठ्ठी निघाली़

-----

५१ ग्रामपंचायतींवर आमचे वर्चस्व : राऊत

दरम्यान, निकालानंतर पत्रकारांशी बोलताना आ़ राजेंद्र राऊत यांनी आमच्या गटाला ७८ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर स्पष्टपणे सत्ता मिळाल्याचा दावा केला़ तर बिनविरोधासह ७२ ग्रामपंचायतींवर आमचे सरपंच विजयी होतील, असेदेखील ते म्हणाले़ त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेल्या उपळे दुमालामध्ये आमचे दोन गट असल्याने त्याठिकाणीदेखील आमचीच सत्ता आली असल्याचे सरपंच निवडीनंतर दिसून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

-----