शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
6
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
9
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
10
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
11
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
12
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
13
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
14
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
15
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
16
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
17
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
19
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
20
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

रेशन दुकानातून आता मीठ विक्रीला प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:22 IST

नागपूर, पुणेनंतर सोलापुरात : पुढील महिन्यापासून होणार प्रारंभ

ठळक मुद्देमीठ हिमोग्लोबीनच्या वाढीसाठी उपयुक्तविक्री रेशनिंगच्या माध्यमातून वाढविण्याची योजनास्वस्त दरात विकण्याची सरकारची योजना आहे. 

सोलापूर : रेशन दुकानातून सरकार आता मीठ विक्रीला प्रोत्साहन देत आहे.  हे मीठ हिमोग्लोबीनच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जात असून, त्याची विक्री रेशनिंगच्या माध्यमातून वाढविण्याची योजना सरकारने आखली आहे.

राज्यात नागपूर आणि पुणे या दोन जिल्ह्यांत हा प्रयोग सुरू झाला आहे. त्यापाठोपाठ पुढील महिन्यात सोलापूर जिल्ह्यातही हे मीठ विक्रीसाठी पाठवले जाणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून धान्य वितरणासाठी ई-पॉस यंत्रणेचा वापर कसा होतो़ या संदर्भात आढावा घेण्यासाठी मागील तीन दिवसांपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर आहेत. शुक्रवारी सोलापुरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. डबल-४५ असे या मिठाचे नाव असून, त्यात हिमोग्लोबीन वाढीसाठी पोषक घटक आहेत. 

नागपूर जिल्ह्यात मागील दोन महिन्यात ६० टन मिठाचे वाटप दुकानदारांच्या माध्यमातून झाले असून, या महिन्यात २८ टनाची मागणी आली असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच पुणे जिल्ह्यातही मीठ विक्रीची प्रक्रिया सुरू झाली असून, मिठाची वाहतूक झाली आहे. पुढच्या महिन्यात सोलापुरतील रेशन दुकानदारांना हे मीठ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.    

रेशन दुकानातून चार डाळींच्या विक्रीचा प्रस्ताव- भविष्यात रेशन दुकानांमधून तूर, हरभरा, मूग आणि उडीद या चार डाळींची विक्री करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहेत. तसा प्रस्ताव राज्य सरकारच्या अन्न पुरवठा विभागाकडे प्रस्तावित आहे. हमीभाव योजनेंतर्गत शेतकºयांकडून हे धान्य विकत घेऊन सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त दरात विकण्याची सरकारची योजना आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरgovernment schemeसरकारी योजनाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय