शिवजयंतीनिमित्त आदर्शस्कूलमध्ये रंगली बालसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:15 AM2021-02-22T04:15:21+5:302021-02-22T04:15:21+5:30

कुर्डूवाडी : येथील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकसभा भरवली गेली. कार्यक्रमास ...

Rangali Bal Sabha in Adarsh School on the occasion of Shiva Jayanti | शिवजयंतीनिमित्त आदर्शस्कूलमध्ये रंगली बालसभा

शिवजयंतीनिमित्त आदर्शस्कूलमध्ये रंगली बालसभा

googlenewsNext

कुर्डूवाडी : येथील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकसभा भरवली गेली. कार्यक्रमास आदिशक्ती शिक्षणसंस्थेच्या कार्यकारी संचालिका पूजा सुरवसे, संस्थापक अमोल सुरवसे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. सत्यजित लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली बालसभा पार पडली. या कार्यक्रमात प्रशालेतील अरमान सय्यद, तनिष्का शिंदे, ऋतुराज जाधव, अजित जाधव , योगिनी जोशी, सुरज करळे, आशिष निकम, स्वराली गवळी, सुमेध हिवराळे, साईश दरेकर, अनिषा जगदाळे या विद्यार्थ्यांनी कविता व भाषणे केली. पार्थ शिंदे, अस्मिता पाटील, प्रेरणा कांबळे, आर्या क्षीरसागर, वैष्णवी बस्के यांनी पोवाडे सादर केले. शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल सुरवसे, प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका शकिलाबी सय्यद, प्राथमिक विभाग प्रमुख आयेशा मुलाणी, सीबीएसई विभागाचे प्रिन्सिपल शैलेश दरेकर उपस्थित होते.

..................

फोटो - २१ कुर्डूवाडी

कुर्डूवाडी येथील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती साजरी करताना बालचमू

Web Title: Rangali Bal Sabha in Adarsh School on the occasion of Shiva Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.