शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

लाखापुढील व्यवहारावर राहणार आयोगाची ‘नजर’ : रणजितकुमार

By admin | Updated: January 28, 2017 12:51 IST

लाखापुढील व्यवहारावर राहणार आयोगाची ‘नजर’ : रणजितकुमार

लाखापुढील व्यवहारावर राहणार आयोगाची ‘नजर’ : रणजितकुमारसोलापूर : निवडणूक काळात बँकांतून कोणी एक लाख रुपये काढले किंवा भरले तर त्याची माहिती संबंधित निवडणूक कक्षाला देण्याचे आदेश जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी बँकांना दिले. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कक्षात घेण्यात आली. महापालिका क्षेत्रासंबंधीच्या अडचणी मुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी मांडल्या. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आदी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीसाठी उमेदवारांना बँकेत नवीन खाते उघडून त्यात रक्कम भरून खर्ची करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराचे बँकेत खाते असले तरी खास निवडणुकीसाठी नवीन खाते उघडणे बँकांना बंधनकारक आहे. बऱ्याच बँकांनी असे करण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या ३0 बँकांच्या प्रतिनिधींना ही सूचना दिली. उमेदवारांना तत्काळ नवीन खाते व चेकबुक देण्यात यावे तसेच एकाच दिवशी बँकेतून १ लाखाच्यावर रक्कम काढत किंवा भरत असेल तर संबंधित निवडणूक कक्षाला माहिती कळवावी. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क खात्याने ठरल्याप्रमाणे नाकाबंदी करावी. राज्य उत्पादन शुल्क खात्याने दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल द्यावा. पोलिसांनी शहरात ८ ठिकाणी नाकाबंदी करून अवैधपणे पैशाची वाहतूक होऊ नये याची काळजी घ्यावी. तपासणीत आढळलेल्या पैशासोबत संबंधित व्यक्ती पुरावे देत असेल तर त्याची खातरजमा करावी. पुरावे नसतील तरच अशी रक्कम जप्त करून आयकर खात्याकडे हे प्रकरण चौकशीला द्यावे. पेट्रोलपंपधारक, व्यापाऱ्यांनी अशी रक्कम नेत असताना संबंधित व्यक्तीजवळ रकमेचे पुरावे असणारी कागदपत्रे द्यावीत. त्यामुळे पुढील गोंधळ टळेल. स्टेशन व बसस्थानकावरही पैसे, दारू व इतर गोष्टीची वाहतूक होत असेल तर याबाबत सतर्क राहावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.-----------------------५० हजारांच्या पुढे चौकशीपोलीस नाकाबंदीत तपासणीवेळी ५० हजारांच्या पुढील रक्कम आढळली तरच सखोल चौकशी करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीजवळ १० हजार, २० किंवा २५ हजार असे खर्चाचे पैसे असतील तर चौकशीसाठी विनाकारण ताटकळत ठेवण्यात येऊ नये. आढळलेल्या कॅशसोबत बँक किंवा व्यापाऱ्याच्या खतावणीचे पुरावे असतील तर विचारात घ्या. पुरावे देणाऱ्यांची अडवणूक करू नका, अशा सूचना यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.