शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी राजश्री भाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:26 AM2021-03-01T04:26:32+5:302021-03-01T04:26:32+5:30

कुर्डूवाडी : शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी राजश्री भाटे तर उपाध्यक्षपदी सीमा ...

Rajshri Bhate as the Chairman of Shikshan Prasarak Mandal | शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी राजश्री भाटे

शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी राजश्री भाटे

Next

कुर्डूवाडी : शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी राजश्री भाटे तर उपाध्यक्षपदी सीमा चिंचवडकर यांची निवड करण्यात आली.

या सभेत संस्थेचे दिवंगत अध्यक्ष वसंतराव कऱ्हाडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रिक्त झालेल्या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यपदी सुनील वसंतराव कऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार नूतन विद्यालय व संस्थेचे चेअरमन प्रभाकर चिंचवडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या सभेला सचिव अनिल कऱ्हाडे, ॲड. सौरभ चिंचवडकर, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके, नूतन इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका शिल्पा चिंचवडकर, उपमुख्याध्यापिका मस्के, पर्यवेक्षक यादव उपस्थित होते.

.......

२८ राजश्री भाटे

कुर्डूवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष राजश्री भाटे व उपाध्यक्ष सीमा चिंचवडकर यांचा सत्कार चेअरमन प्रभाकर चिंचवडकर यांनी केला.

Web Title: Rajshri Bhate as the Chairman of Shikshan Prasarak Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.