शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा : ३८ जुगाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By appasaheb.patil | Updated: May 22, 2024 16:58 IST

६ चारचाकी, ४० मोबाईल सह सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम सापडली : सुरत, रत्नागिरी, बीड हून आलेले जुगारी

सोलापूर: अनगर ( ता.मोहोळ ) येथील लोकनेते पॅलेस या दुमजली जुगार अड्ड्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली असता यावेळी २ लाख २६ हजार रुपयांची रोकड आणि ६ चारचाकी वाहने, ४० मोबाईल अशी १ कोटी ३ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनगर ते माढा या रोडवर अनगर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकनेते पॅलेस या दोन मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि परि.सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वखालील पोलीस पथकाने  लोकनेते पॅलेस या ठिकाणी छापा मारला.

त्यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रियाज बसू मुजावर मोहोळ, विनायक नीलकंठ ताकभाते सोलापूर, फारुख शेख याकूब, रा.ओम नगर, सुरत ( गुजरात ), नितीन गुंड अनगर, ओंकार विजय चव्हाण, चिंचनाका चिपळूण,( जिल्हा रत्नागिरी) राजु लक्ष्मण भांगे, मार्डी, ता. उत्तर सोलापूर, महादेव बंडोबा पवार सोलापूर,मनोज नेताजी सलगर सोलापूर,स्वप्नील कोटा सोलापूर, रोनक नवनीत मर्दा सोलापूर, हर्षल राजेंद्र सारडा सोलापूर, कृष्णा अर्जुन काळे सोलापूर, अनिल किसन चव्हाण सांगोला, धनप्पा भद्रे सोलापूर,अब्रार करीम फकीर चिपळूण (जिल्हा रत्नागिरी ) लखन जगदीश कोळी मोहोळ, सोमनाथ दादासाहेब मोरे मोहोळ, महादेव मुरलीधर दगडे करोळे ( ता.पंढरपूर), राम बलभीम कदम अनगर, कृष्णा कल्याण राऊत अकलूज, विलास धर्मराज कडेकर,वडवणी ( जी.बीड), सुशील कैलास लंगोटे माढा, हे आरोपी तीरोट नावाचा जुगार खेळताना सापडले.

तर दीपक चंद्रकांत गायकवाड मोहोळ, राजू हसन शेख पोखरापुर, ता मोहोळ, आय्याज इब्राहिम सय्यद, मोहोळ, दिनेश सुखदेव चवरे पेनुर , बालाजी केरबा भोसले कोंडी ,ओंकार नेहरू बरे मोहोळ, अप्पा सिद्राम पाटील घोडेश्वर मोहोळ, एकनाथ भगवान चांगिरे, परळी ( जि.बीड), विशाल रघुनाथ क्षीरसागर मोहोळ, संभाजी सोपान कवितकर, अनगर, (ता.मोहोळ), फिरोज बाबू शेख मोहोळ, सीताराम रामचंद्र कुंभार मोहोळ, सज्जन लक्ष्मण शेळके कोन्हेरी मोहोळ, गोविंद महादेव पाटील, कोंडी ( उत्तर सोलापूर), प्रशांत प्रकाश पाटील वैराग (ता.बार्शी), सोमनाथ भीमराव जोकारे, कांदलगाव दक्षिण सोलापूर हे ३८ लोक तिरोट खेळताना लोकनेते पॅलेस मध्ये दुसऱ्या मजल्यावर आढळून आले.

यावेळी महिंद्रा थार,महिंद्रा एक्स यू व्ही, स्विप्ट डिझायर, फोक्स वॅगन अशा ६ चारचाकी गाड्या, आणि १४ लाख ११ हजार रुपये किमतीचे ४० मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ३ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.