शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह; लाख-दीड लाखांत होणाºया कामासाठी कोट्यवधी खर्च का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:29 IST

दोन तांत्रिक सल्लागारांना तत्काळ हटवा, पालिका आयुक्तांचे आणखी एक नवे पत्र

ठळक मुद्देक्रिसील कंपनीला हटविण्याचा प्रयत्न यापूर्वीचे सीईओ डॉ. अविनाश ढाकणे, दीपक तावरे यांच्या काळात काही लोकांनी केला होतामहापालिकेतील अनेक अधिकाºयांनी क्रिसीलचे काम समाधानकारक नाही. या कंपनीला विनाकारण लाखो रुपये दिले जात आहेतमनपा अधिकाºयांनी या कंपनीच्या प्रतिनिधींना खडसावले होते. परंतु, मुंबईस्थित अधिकाºयांच्या दबावामुळे हे थांबल्याची चर्चा आहे

राकेश कदम

सोलापूर : महापालिकेचे अधिकारी जे काम लाख-दीड लाख रुपयांमध्ये करुन घेऊ शकले असते, त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी आज दरमहा कोटी रुपये मोजत आहे. तीन सल्लागार कंपन्यांपैकी क्रिसील आणि एसजीएस या दोन कंपन्यांना तत्काळ हटवण्यात यावे. यासंदर्भातील प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळासमोर ठेवण्यात यावा, असे पत्र महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे कार्यकारी संचालक त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांना दिले आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी संचालकपदावरुन बाजूला झाल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर स्मार्ट सिटीतील त्रुटींवर बोट ठेवत आहेत. कंपनीचे नवे कार्यकारी संचालक त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यांनी पुन्हा एक पत्र दिले आहे. क्रिसील कंपनी गुणवत्तेची सेवा देत नाही. क्रिसीलचे लोक अनेकदा कामाच्या साईटवर येत नसल्याच्या तक्रारी मनपा अधिकारी करीत आहेत. कामाच्या गुणवत्तेवरही नियंत्रण नाही. क्रिसील करीत असलेली कामे मनपातील ज्युनिअर इंजिनिअरही करू शकतो.

या ज्युनिअर इंजिनिअरला आम्ही २० ते २५ हजार रुपये पगार देतोय. दुसरीकडे क्रिसीलसारख्या कंपनीला दरमहा लाखो रुपये मोजावे लागत आहेत. एसजीएसच्या सेवेवरही प्रश्नचिन्ह आहे. सर्वच कंपन्यांना कामाच्या पूर्णत्वानुसार पैसे द्या. काम होवो अथवा न होवो या कंपन्यांना पैसे दिलेच पाहिजेत, या अटी व शर्तीवर फेरविचार करा. यातून स्मार्ट सिटीचे कोट्यवधी रुपये वाचतील, अशा आशयाचे मत मांडले आहे. ढेंगळे-पाटील यांनीही ‘लोकमत’ला या पत्राबद्दल दुजोरा दिला.

यादरम्यान, तिन्ही तांत्रिक सल्लागार कंपन्यांच्या अधिकाºयांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासोबत चर्चा केली. आम्ही आवश्यक ती कामे नियमितपणे पूर्ण करीत आहोत. करारानुसार आता पैसे दिलेच पाहिजेत, अन्यथा आम्हाला इतर मार्ग मोकळे असल्याचा इशाराही दिला आहे.

फाईल सापडत कशी नाही?सोलापूर डेव्हलपमेंट कंपनीने 'क्रिसील'सोबत चार वर्षांपूर्वी करार केला. हा करार करण्यापूर्वी कंपनीच्या संचालकांनी क्रिसीलवर कामाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी इतिवृत्तांत तयार केला होता. ही फाईल अजूनही मिळत नाही. फाईल गायबच कशी होते, असा सवालही पी. शिवशंकर यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वीही क्रिसीलला हटवण्याचे प्रयत्नक्रिसील कंपनीला हटविण्याचा प्रयत्न यापूर्वीचे सीईओ डॉ. अविनाश ढाकणे, दीपक तावरे यांच्या काळात काही लोकांनी केला होता. महापालिकेतील अनेक अधिकाºयांनी क्रिसीलचे काम समाधानकारक नाही. या कंपनीला विनाकारण लाखो रुपये दिले जात आहेत. मनपा अधिकाºयांनी या कंपनीच्या प्रतिनिधींना खडसावले होते. परंतु, मुंबईस्थित अधिकाºयांच्या दबावामुळे हे थांबल्याची चर्चा आहे. पी. शिवशंकर यांनी मात्र नगरविकास खात्याकडे तक्रार केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीfraudधोकेबाजीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका