शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दर वाढतील म्हणून अधिक महिन्याची खरेदी; अक्षयतृतीयेलाच घेतली जावयांसाठी चांदी

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 23, 2023 17:33 IST

अधिक महिना काही दिवसांवर (जुलै) येऊन ठेपला असून सोने-चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : अधिक महिना काही दिवसांवर (जुलै) येऊन ठेपला असून सोने-चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. काही हुशार मंडळींनी जावई लोकांना खूश करण्यासाठी अक्षय तृतीयेदिनीच चांदीच्या वस्तू खरेदी केल्या. त्यामध्ये निरंजन, गाय-वासरू, ताट अशा वस्तूंचा समावेश होता.

अक्षय तृतीयेला चांदीचे क्वाईन, बिस्कीटांची खरेदी झाली. पायाच्या करंगळीत घालण्यासाठी बिच्छवा आणि अंगठ्याच्या बाजुला लक्ष्मी बोटात घालण्यासाठी जोडवी देखील पुष्कळ व्हरायटीत उपलब्ध झाले. पैंजन, कडा पैंजन, मराठमोळा दागिना म्हणून पाहिल्या जाणारा कोल्हापुरी साज, बारीक पातळ चेन असे अनेक प्रकार पाहायला मिळाले.परतावा २० टक्के अधिक

मागील वर्षाच्या तुलनते यंदा चांदीचा परतावा २० टक्के अधिक आहे. मागील अक्षय तृतीयेला सोन्याचा दर ५३ हजारांवर होता. यंदा ६० हजार ४०० रुपयांवर स्थिरावला. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्यातील परतावा हा ७ हजार ४०० रुपयांनी (१४ टक्के) अधिक होता. तसेच मागील वर्षी चांदीचा दर ६२ हजार रुपये होता तर यंदा ७४ हजार रुपये (१४ टक्के) किलो राहिला.यंदा चांदीतून परतावा ग्राहकांना शेअर मार्केटपेक्षा अधिक मिळतोय. दुसरीकडे दरवाढीच्या शक्यतेने काही लोक अधिक महिन्यात जावई-मुलीसाठी दिली जाणारी चांदीची भेटवस्तूही अक्षय तृतीयेलाच खरेदी केली. - गिरीश किवडे, सराफ व्यवसायिकसहा महिन्यात वृद्धी

सप्टेंबर २०२२ : ५८००० रु.ऑक्टोबर २०२२ : ५९,५०० रु.नोव्हेंबर २०२२ : ६१,७०० रु.डिसेंबर २०२२ : ६५००० रु.जानेवारी २०२३ : ६८,५०० रु.फेब्रुवारी २०२३ : ६९००० रु.मार्च २०२३ : ६९,८०० रु.एप्रिल २०२३ : ७४००० रु.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाSolapurसोलापूर