शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात हरभºयाचा पेरा अडीच पट वाढला, गव्हाचेही क्षेत्र वाढलेच, ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 09:25 IST

जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देरब्बी हंगामातील पेरणीसाठी यावर्षी पावसामुळे उशीर झाला होतासोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा व त्यातही ज्वारीची पेरणी क्षेत्र सरासरी मोठ्या प्रमाणावर असतेयावर्षी सरासरी क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे

अरुण बारसकर  सोलापूर दि ६ : जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले.रब्बी हंगामातील पेरणीसाठी यावर्षी पावसामुळे उशीर झाला होता. परतीचा पाऊस उशिरापर्यंत पडत राहिल्याने रब्बीची पेरणी दरवर्षीपेक्षा उशिराने सुरू झाली. याचा परिणाम ज्वारीचे क्षेत्र घटण्यामध्ये झाला. सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा व त्यातही ज्वारीची पेरणी क्षेत्र सरासरी मोठ्या प्रमाणावर असते; मात्र यावर्षी सरासरी क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. यावर्षी पावसाला जून महिन्यातच सुरुवात झाली. यामुळे खरिपातील पिकांचे क्षेत्रही सरासरीपेक्षा वाढले होते. मधल्या कालावधीत खंडित झालेला पाऊस आॅगस्टनंतर सक्रिय झाल्याने ऊस लागवडीवर शेतकºयांनी लक्ष केंद्रीत केले. पाऊस चांगला पडल्याने व उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उसाचे क्षेत्र अनायसा वाढले आहे. त्यातच परतीचा पाऊस आॅक्टोबरपर्यंत पडत राहिल्याने रब्बीच्या पेरणीवर परिणाम झाला. जिल्ह्याचे ज्वारी पेरणीचे सरासरी क्षेत्र ५ लाख ५६ हजार ८०० हेक्टर होते. प्रत्यक्षात तीन लाख १२ हजार ५०० हेक्टरच्या जवळपास ज्वारीची पेरणी झाल्याची कृषी खात्याची आकडेवारी सांगते. उशिरा वाफसा झालेल्या जमिनीवर शेतकºयांनी मका पीक घेण्याला प्राधान्य दिले. यामुळे सरासरीच्या दीडपट क्षेत्रावर मका पीक घेतले. उशिराने हरभरा व गव्हाची पेरणी केली जाते. ज्वारी व अन्य पिके न घेतलेल्या शिल्लक क्षेत्रावर शेतकºयांनी गहू व हरभºयाची पेरणी केली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात ५५ हजार ३०० हेक्टरवर तर हरभºयाचे सरासरी क्षेत्र ३६ हजार ६०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ७८ हजार ८०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. गहू सरासरीच्या दीडपट तर हरभरा सरासरीच्या अडीचपट पेरणी झाली आहे. ------------------मागील वर्षीपेक्षाही अधिक हरभरा च्मागील वर्षी सरासरीच्या दीडपट हरभºयाची पेरणी झाली होती. यावर्षी सरासरीच्या अडीचपट पेक्षाही अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. यावर्षी हरभºयाचे अधिक उत्पादन झाले तर दराची मोठी घसरण होईल अशी भीती कृषी अधिकारी व शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने हरभºयाचे दर घसरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. -------------------------आता ऊस अन् कांदा सगळीकडे..च्यावर्षी पाऊस चांगला पडल्याने व अन्य पिकांतून पैसे मिळत नसल्याने शेतकºयांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लावला आहे. सुधारित जातीच्या बेण्याचा वापर  केला आहे. याशिवाय कांद्याला चांगला भाव असल्याने जमेल त्या ठिकाणी कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे ऊस व कांदा सगळीकडेच दिसत आहे. -----------------हरभºयाचे क्षेत्र वाढले आहे. पीकही चांगले आहे. अधिक उत्पादन होईल असे वरिष्ठांना बैठकीत सांगितले आहे. जवळपास सर्वच पिकांचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज आहे.- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय