चपळगाव : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ न्यासाच्या परिसरात रविवारी न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या लहान मुलांनी व न्यासाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या पाल्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. शेकडो बालकांना पल्स पोलिओचा डोज देण्यात आला. या उपक्रमास अक्कलकोट येथील सी. बी. खेडगी महाविद्यालयाचे एन.सी.सी. विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी डॉ. सतीश बिराजदार, शंकरराव कुंभार, एल. सी.चिंचुरे, डी. व्ही. चव्हाण, संतोष भोसले, मेजर श्रीकांत मोरे, प्रवीण घाडगे, नितीन शिंदे , प्रशांत साठे, अतिश पवार, अमोल रजपूत, एस.के.स्वामी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, प्रथमेश पवार, बलभीम पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण उपस्थित होते.
-----