शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरातील कार्तिक यात्रा काळात स्वच्छतेला प्राधान्य द्या, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:02 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : पंढरपुरातील धोकादायक इमारती, मठ आदींना वारंवार नोटिसा देऊनही त्या हटविण्यात आलेल्या नाहीत. कार्तिकी एकादशीच्या तोंडावर या इमारती तत्काळ पाडून टाका, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकाºयांना सोमवारी दिले. यात्रा काळात स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याला प्राधान्य देऊन नियोजन करा, असेही त्यांनी ...

ठळक मुद्देपंढरपुरातील धोकादायक इमारती तत्काळ पाडून टाकायात्रा काळात स्वच्छता महत्त्वाचीवारकरी-भाविकांना समाधान वाटावे अशा प्रकारे  स्वच्छतेचे नियोजन करा

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : पंढरपुरातील धोकादायक इमारती, मठ आदींना वारंवार नोटिसा देऊनही त्या हटविण्यात आलेल्या नाहीत. कार्तिकी एकादशीच्या तोंडावर या इमारती तत्काळ पाडून टाका, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकाºयांना सोमवारी दिले. यात्रा काळात स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याला प्राधान्य देऊन नियोजन करा, असेही त्यांनी सांगितले. पंढरपुरात ३१ आॅक्टोबर रोजी कार्तिक एकादशीचा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कार्तिक वारीत पंढरपुरात वारकरी-भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यासाठी पंढरपुरात वारीपूर्वी आणि वारीनंतर करावयाच्या स्वच्छतेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. येणाºया वारकरी-भाविकांना समाधान वाटावे अशा प्रकारे  स्वच्छतेचे नियोजन करावे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांचाही सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. ------------------ पंढरपूर शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याबरोबरच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ करावे. महावितरणने कार्तिक वारी कालावधीत शहरात व ६५ एकर येथे अखंडित वीज पुरवठा सुरळीत राहील याबाबत दक्षता घ्यावी. - अन्न व औषध प्रशासन विभागाने फेरीवाले, हॉटेल यांच्याकडील अन्न पदार्थांची तपासणी करावी. यासाठी पथके कार्यान्वित करावीत. पंढरपूर नगरपरिषदेने वारी कालावधीत  शहरातील धोकादायक इमारतींमध्ये वारकरी-भाविक वास्तव्यास राहणार नाहीत याबाबत खबरदारी घेऊन शहरातील मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा. - गर्दीच्या मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याबाबतही नगरपालिकेने कारवाई करावी. मंदिर समितीने दर्शन मंडप, स्काय वॉक, पत्राशेड, दर्शन रांगेत वारकºयांना देण्यात येणाºया सुविधा याबाबत नियोजन करावे. -------------------- महाराष्ट्र एस.टी. महामंडळाने आवश्यक जादा एस.टी. बसचे नियोजन करावे. - वारी कालावधीत अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने संबंधितांना सूचना द्याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठकीत दिल्या.