शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शिवजन्मोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी रसूल पठाण यांची निवड, शिवभक्त मुस्लीम तरुणास मिळाली संधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:54 IST

शहरातील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी शाब्दी सोशल गु्रपचे अध्यक्ष रसूल पठाण यांची निवड करण्यात आली़

ठळक मुद्देरसूल पठाण हे शाब्दी सोशल गु्रपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत़मागील दोन वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मेघडंबरीला विद्युत रोषणाई करीत आहेत़श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी निवडीची बैठक श्री छत्रपती शिवाजी मैदान, डाळिंबी आड, शिंदे चौक येथे झाली़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : शहरातील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी शाब्दी सोशल गु्रपचे अध्यक्ष रसूल पठाण यांची निवड करण्यात आली़ शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी मुस्लीम समाजातील शिवभक्तास संधी देऊन मध्यवर्ती मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे़ श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी निवडीची बैठक श्री छत्रपती शिवाजी मैदान, डाळिंबी आड, शिंदे चौक येथे झाली़ या बैठकीस परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, मराठा महासंघाचे दास शेळके, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष धर्मा भोसले, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य सुनील रसाळ, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांग डांगे, सुनील कामाठी, माजी उपमहापौर नाना काळे, अर्जुन सुरवसे, बाळासाहेब पुणेकर, बापूसाहेब डांगे, संभाजी ब्रिगेडचे श्रीकांत घाडगे, शिवसेना विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड आदी उपस्थित होते़ रसूल पठाण हे शाब्दी सोशल गु्रपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत़ मागील दोन वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मेघडंबरीला विद्युत रोषणाई करीत आहेत़ त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या बैठकीत त्यांच्याकडे यंदा अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला़ पठाण यांच्या निवडीने मुस्लिम समाजातील विविध संस्था, संघटनांनी अभिनंदन केले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज