शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक यंदा मार्चअखेर होणार सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 15:51 IST

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ठरल्याप्रमाणे मार्चअखेर सादर करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे.  जिल्हा परिषदेचे प्रशासन दरवर्षी मार्चअखेर ...

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ठरल्याप्रमाणे मार्चअखेर सादर करण्याची प्रशासनाने तयारी केली यंदा लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागण्याअगोदर अंदाजपत्रकीय सभा घ्या, असा आग्रह सदस्यांनी केलाअंदाजपत्रकीय सभा घेण्याबाबत झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्याशी चर्चा

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ठरल्याप्रमाणे मार्चअखेर सादर करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासन दरवर्षी मार्चअखेर अंदाजपत्रक सादर करीत असते. पण यंदा लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागण्याअगोदर अंदाजपत्रकीय सभा घ्या, असा आग्रह सदस्यांनी केला आहे. त्यामुळे अंदाजपत्रकीय सभा घेण्याबाबत झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

शिंदे यांनी प्रशासनाने तयारी करून नेहमीच्या पद्धतीने अंदाजपत्रक सादर करण्यास संमती दिली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सर्व विभागाचा खर्चाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चाची आकडेवारी संकलित करून नवीन आर्थिक वर्षात कोणत्या नवीन योजना घ्याव्यात त्याबाबत तरतुदी सुचविण्यात येणार आहेत. 

गतवर्षी झेडपीचे सुमारे ४५ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्यानंतर पुरवणीत सुमारे २० कोटींची वाढ करण्यात आली. यंदाही विविध योजनांसाठी वाढीव निधी मागण्यात आला आहे. त्यामुळे अंदाजपत्रक वाढणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ठरल्याप्रमाणे मार्चअखेर अंदाजपत्रक सादर करण्यात येणार असल्याने सर्व विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे.  शासनाने विविध योजनांपोटी दिलेला निधी मार्चअखेर खर्ची टाकण्यास बंदी घातली आहे.

जानेवारीनंतर कोणत्याही नवीन कामांचे टेंडर काढता येणार नाही, अशी राज्य शासनाकडून अट घालण्यात आल्याने काही योजनांचा निधी आता खर्चाअभावी शिल्लक राहणार आहे.  जिल्हा नियोजनकडून मिळणारा निधी जवळजवळ ८० टक्क्यांवर खर्ची घालण्यात आला आहे. हा निधी जवळपास २५0 कोटींपर्यंत आहे. पण इतर योजनांचा निधी ६0 टक्क्यांवर खर्ची पडला आहे. त्यामुळे यातील काही रक्कम परत जाईल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.  

झेडपीच्या अंदाजपत्रकाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाच्या नियोजनाप्रमाणे अंदाजपत्रक सादर करावे अशा सूचना दिल्या आहेत. -संजय शिंदे, अध्यक्ष, झेडपी

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBudgetअर्थसंकल्प