शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरातील आरोग्य विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 11:48 IST

कार्तिकी शुद्ध एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी ५ ते ६ लाख भाविक पंढरपूर नगरीत येणार असे गृहीत धरुन येणाºया भाविकांना आरोग्याबाबत सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

ठळक मुद्देमोकाट जनावरांचा बंदोबस्त अन्न पदार्थांवर नियंत्रणआरोग्य प्रयोगशाळेचे अधिकारी कार्यरत असणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ३० : कार्तिकी शुद्ध एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी ५ ते ६ लाख भाविक पंढरपूर नगरीत येणार असे गृहीत धरुन येणाºया भाविकांना आरोग्याबाबत सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.२९ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकी यात्रेनिमित्त शहरात गर्दी राहणार आहे. या कालावधीत शहरात स्वच्छता राहावी. शहरातील नागरिकांचे व भाविकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्याचे काम होत आहे.यात्रा काळात शहरवासीयांना व यात्रेकरुंना शुद्ध व निर्जंतुक पाणीपुरवठा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा केंद्राकडून करण्यात येतो. तसेच शहरातील विहिरी व कूपनलिकांचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. या पिण्याच्या पाण्याची नगरपालिका व जिल्हा परिषदेचे आरोग्य निरीक्षक दररोज क्लोरीन टेस्ट पाहतात. या यात्रा कालावधीमध्ये सोलापूर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे अधिकारी कार्यरत असणार आहेत.शहरातील सर्व पटांगणे, नदी परिसर रोजच्या रोज स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी हंगामी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज शहरात ५ टक्के मॅलेथॉन पावडर,  ब्लिचिंग पावडर तसेच फिनाईलचा वापर करण्यात येतो. नदीच्या घाटावर व पटांगण परिसरात प्रात:र्विधीसाठी तात्पुरते संडास तयार करण्यात येतात. तसेच ५ फिरती शौचालये वापरण्यात येतात. ते निर्जंतुक करण्यात येतात. शहरातील कचरा दररोज साफ करण्यासाठी नगरपालिकेची ८ वाहने व शासनाचे ८ टिपर रिक्विझीशनद्वारे मिळतात. अशी १६ वाहने व तीन कंटेनर कॅरिअर व १२५ कॅरिअरद्वारे शहरातील कचरा उचलण्याचे काम करण्यात येणार आहे व कुंडावर त्वरित ५ टक्के मॅलेथॉन पावडर फवारण्यात येते व प्रोपॉक्सर फवारुन घरमाश्यांचा नायनाट करण्यात येत आहे. तसेच चार ब्लोअर मशीनने नदीचे वाळवंट, ६५ एकर, पत्राशेड, मोकळी पटांगणे व रस्त्याच्या बाजूने बायो कल्चर फवारण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितली. ---------------------अन्न पदार्थांवर नियंत्रणशहरातील कच्ची, नासकी फळे यांचा नाश करण्यात येणार आहे. यासाठी सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयास योग्य त्या उपाययोजना व कार्यवाहीबाबत पत्र देण्यात आले असल्याची माहिती डॉ. संग्राम गायकवाड यांनी दिली.मोकाट जनावरांचा बंदोबस्त शहरात मोकाट जनावरे सोडू नयेत असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. यात्रा कालावधीपूर्वी शहरातील इतर मोकाट जनावरे पकडून शहराबाहेर सोडण्यात येणार आहेत.