नरखेड : प्रभावती दिगंबर कोल्हाळ (८७, रा. एकुरके, ता. मोहोळ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोल्हाळ त्यांच्या त्या मातोश्री होत.
प्रसाद काटकर
मोडनिंब : प्रसाद सुधाकर काटकर (३५, रा. मोडनिंब, ता. माढा) निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
रामदास कनकी
सोलापूर : हार्डवेअर व्यापारी रामदास मल्लप्पा कनकी (८०, रा. घोंगडेवस्ती, सोलापूर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
मल्लव्वा पिस्के
सोलापूर : मल्लव्वा पेंटप्पा पिस्के (९७, रा. गोदुताई विडी घरकूल-अ, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) यांंचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.