शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिकेत १४५२ कर्मचाºयांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 14:47 IST

महापालिकेने वाढविली ४४९ पदे, सभेकडे प्रस्ताव: १४५२ पदे आहेत रिक्त

ठळक मुद्दे गेल्या आठ वर्षांत पदोन्नती देण्यात आलेली नव्हती रिक्त जागा व पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा होणार डीपीसी किंवा सरळसेवेद्वारे कर्मचारी भरण्याचा मार्ग

सोलापूर : महापालिकेच्या कर्मचाºयांचा आकृतीबंद तयार करण्यात आला असून, रिक्त पदातील चतुर्थश्रेणी कर्मचारी कमी करून ४४९ पदे नव्याने मंजूर करण्याचा प्रस्ताव लवकरच प्रशासनाकडून सभेकडे सादर करण्यात येणार आहे. 

महापालिकेला अधिकारी ते कर्मचारी अशी ५४00 पदे मंजूर आहेत. महापालिकेची निर्मिती झाल्यापासून म्हणजे १९५६ नंतर कोणत्याही प्रकारची कर्मचारी भरती झालेली नाही. त्यामुळे मंजूर पदापैकी १४५२ पदे रिक्त झाली आहेत. सध्या जवळजवळ ३९00 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे विविध विभागात कंत्राटी कर्मचाºयांवर भर देऊन काम रेटले जात आहे. असे असले तरी आस्थापना खर्च ३५ टक्क्याच्यावर वर जात असल्याने (५५ टक्के) शासनाने कोणतीही पदे भरण्यास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांचा आकृतीबंद तयार करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक विभागाकडून आढावा घेतला गेला आहे. 

महापालिकेत गेल्या आठ वर्षांत पदोन्नती देण्यात आलेली नव्हती. सेवा ज्येष्ठतेप्रमाणे अधिकारी व कर्मचाºयांची यादी करण्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. बिंदूनामावली, रोस्टर तपासून घेतल्यानंतर रिक्त जागा व पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर डीपीसी किंवा सरळसेवेद्वारे कर्मचारी भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

रिक्त असलेल्या पदातून चतुर्थश्रेणीची पदे कमी करून ४४९ तांत्रिक पदे नव्याने तयार करण्यात आली आहेत. या पदांना मंजुरी द्यावी म्हणून प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला सभेची मान्यता घ्यावी लागणार आहे.  प्रशासनाने तयार केलेला आकृतीबंद तातडीने सभेकडे पाठविण्यात यावा अशी मागणी कर्मचारी युनियनचे अशोक जानराव यांनी केली आहे.

पाणीपट्टीवाढीस विरोध- प्रशासनाने पाणीपुरवठा विभागातील तूट भरून काढण्यासाठी २५ टक्के पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव कदापि मान्य केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया सभागृहनेते संजय कोळी यांनी दिली. अंदाजपत्रकात तुटीपोटी रकमा वर्ग केल्या आहेत. कोणतीही करवाढ, दरवाढ केली नसल्याने प्रशासनाला सभेचा प्रस्ताव डावलता येणार नाही. युजर चार्जेस रद्द करण्याबाबत आमचा पाठपुरावा राहणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका