शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

वडील दारू पितात म्हणून पोरगं निघून गेलं; पोलिसांच्या मदतीनं आईच्या कुशीत विसावलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:24 PM

बार्शी तालुक्यातील घटना : मुलाला पाहताच मातेनं फोडला हंबरडा...

संजय बोकेफोडे

कुसळंब : वडिलांना दारू पिऊ नका म्हणत असतानाही दारू पिऊन दुचाकी चालवून अपघात घडविला़ त्यामुळे १० वर्षांचं पोरगं वडिलांना अपघातस्थळी सोडून निघून गेलं... पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आठ तासांनंतर आईच्या खुशीत विसावलं.. पिंटू (काल्पनिक  नाव, जि. अहमदनगर) त्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दीपक गेणू पवार याची लहान मुलगी आजारी असल्याने तिला बार्शी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे़ दवाखान्यात जास्त लोकांना राहण्यास जागा नसल्याने पिंटूचे वडील सासरवाडी (पिंपळगाव दे़) येथे जाताना पिंटूने वडिलांना तुम्ही आता दारू पिऊ नका, असे सांगितले़ मात्र वडिलाने दारू पिऊन दुचाकी चालविताना पडून जखमी होऊन बेशुद्ध पडले़ पिंटूही जखमी झाला़ तशा स्थितीतही आपले वडील माझे ऐकत नाहीत म्हणून निराश झालेला पिंटू अंधाºया रात्री धोत्रे गावापासून कुसळंबमार्गे बार्शीकडे निघाला. काही अंतरावर गेला़ कुसळंब टोलनाक्याजवळ आल्यानंतर त्याला भूक लागली, पण जवळ पैसे नाहीत़ आपल्याला कोण जेवण देणार, या चिंतेत होता़ पुढे चालत असताना एक हॉटेल दिसले़ हॉटेल मालकास मला भूक लागली आहे़ काहीतरी खायला द्या म्हणताच मालक अण्णा काशीद यांनी त्याला एक वडापाव व बिस्कीट पुडा दिला़ ते खाल्ल्यानंतर तू कुठला, कुठे चालला आहेस, अशी विचारणा केल्यानंतर गावचे नाव सांगून सर्व हकिकत सांगितली.

हा प्रकार पोलिसांना सांगताच घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन माने, महेश डोंगरे, रामदास साठे दाखल झाले़ त्या मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सर्व हकिकत कळाली़ शिवाय माझी बहीण बार्शी येथील दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगताच त्याला घेऊन पोलीस दवाखान्यात आले़ मुलाला पाहून त्या मातेने हंबरडा फोडला अन् पिंटू आईच्या खुशीत विसावला़ नंतर पिंटूच्या सांगण्यावरून त्याच्या वडिलास पोलीस ठाण्यात आणले़ यासाठी प्रवीण झांबरे, प्रवीण काशीद, रोहित शिंदे, प्रमोद ढोबळे, राजेंद्र काशीद, नाना गादेकर या खाकी वर्दीतील माणुसकीने सहकार्य करुन माणुसकी दाखवली. 

अशी झाली ‘लोकमत’ची मदतश्यामला भूक लागल्यानंतर कुसळंब टोलनाक्याजवळील हॉटेल मालक आण्णा काशीद यांनी त्यास खाऊ दिले़ नंतर सर्व चौकशी केली़ त्यानंतर काशीद यांनी ‘लोकमत’चे वार्ताहर संजय बोकेफोडे व पोलीस पाटील गणेश काळे यांना सांगितले़ हे दोघे घटनास्थळी दाखल होऊन बोकेफोडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांना ही घटना सांगितली़ त्यानंतर तो मुलगा आईच्या खुशीत विसावला़

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीMissingबेपत्ता होणंSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस