आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी बुधवार ९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला़ दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे ५०० वकीलांनी मतदान केले़ या निवडणुकीसाठी एकूण १११४ मतदार आहेत़ मतदान प्रक्रिया दुपारी ४ वाजेपर्यत चालणार आहे़ सायंकाळी ५ नंतर लगेच मतमोजणीस प्रारंभ होणार आहे़ रात्री ११ वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहे़ या निवडणुक प्रक्रियेत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून बारचे अध्यक्ष लक्ष्मण मारडकर आणि त्याचे पदाधिकारी काम पाहत आहेत़
सोलापूर बार असोसिएशनसाठी मतदान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 14:09 IST