शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण; ढेंगळे-पाटलांवरून सोलापूर महापालिकेत काळे - पाटील भिडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:52 IST

मनपा उपायुक्तपदावरील नियुक्तीचे समर्थन आणि विरोधही

ठळक मुद्देमहापालिकेत एक अनुभवी अधिकारी हवा असल्याचा सूर जिल्हा प्रशासनातून निघतोयढेंगळे-पाटील यांच्या नियुक्तीला सुरेश पाटलांनी विरोध केला आहेसोलापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा

सोलापूर : महापालिकेच्या उपायुक्तपदी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या नियुक्तीवरून उपमहापौर राजेश काळे आणि नगरसेवक सुरेश पाटील एकमेकांना भिडले आहेत. ढेंगळे-पाटील यांच्या नियुक्तीला सुरेश पाटलांनी विरोध केला आहे. सुरेश पाटील यांनी पक्षाला विचारात न घेता पत्रकबाजी केली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. महापालिकेत एक अनुभवी अधिकारी हवा असल्याचा सूर जिल्हा प्रशासनातून निघतोय. सध्या उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सोलापूर शहरात बराच काळ काम केले आहे. त्यांची पुन्हा मनपा उपायुक्तपदी नियुक्ती व्हावी, यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. 

ढेंगळे-पाटील वादग्रस्त आहेत. त्यांची नियुक्ती करू नये. त्यांच्या कामाची चौकशी करावी. त्यांच्यावर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उपमहापौर राजेश काळे मैदानात उरले. सुरेश पाटील हे साधे नगरसेवक आहेत. त्यांनी हे पत्र पाठवण्यापूर्वी महापौर, उपमहापौर यांच्याशी चर्चा केली नाही. सुरेश पाटलांचे लक्ष केवळ पैशावर असते. ढेंगळे-पाटील आमचा पक्ष चालवायला आणि सुरेश पाटलांचे घर चालवायला येणार नाहीत तर या शहराचे भले करण्यासाठी येणार आहेत. जो अधिकारी सुरेश पाटलाला पैसे देत नाही तो त्यांच्या लेखी भ्रष्ट असतो. महापालिकेचा कारभार सुरेश पाटलांसारखे लोक चालविणार आहेत का? आमचा पक्ष ही गोष्ट किती दिवस खपवून घेणार? ढेंगळे-पाटील सोलापुरात यावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

मागील महिन्यात मी मनपा आयुक्तांविरोधात प्रस्ताव दिला. त्यावरून सभागृहाने मला कारणे दाखवा नोटीस दिली. सुरेश पाटलांना आमचा पक्ष नोटीस बजावणार का? हे मी बघणार आहे. एका उपमहापौरावर कारवाई करता, मग नगरसेवकाबद्दल पक्षाचे धोरण काय? हे सुद्धा कळले पाहिजे.- राजेश काळे, उपमहापौर

दीड वर्षांपूर्वी मी ढेंगळे-पाटील यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी राजेश काळे माझ्यासोबत होते. आता मात्र ते ढेंगळे-पाटलांची बाजू घेत आहेत. यातून कोण भ्रष्ट आहे हे जनतेला समजते. काळे हे नव्याने उपमहापौर झाले. मी ज्येष्ठ नगरसेवक आहे. पक्षाने मला विचारले तर मी उत्तर देईन; पण काळेंनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये.- सुरेश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारणOsmanabadउस्मानाबाद