शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडण्यासाठी सोलापूर शहरात पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:55 IST

सोलापूर : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसात कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...

ठळक मुद्देविजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत गुन्हेगारांची तपासणी केली शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसात कोम्बिंग आॅपरेशनरात्रीच्या वेळी केली तपासणी : शांतता, सुव्यवस्थेच्या दृष्टीने घरी जाऊन घेतली माहिती

सोलापूर : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसात कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०० ते १२५ गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. 

शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनच्या वतीने कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली २० ते २५ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. हद्दीतील तडीपार आरोपी आढळून आले नाहीत.

दोन वॉरंटमधील आरोपी घरी आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत एकूण १५ आरोपींची तपासणी करण्यात आली, त्यातील ७ आरोपी घरी मिळून आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. दरम्यान, २५ ते ३० आरोपींची तपासणी करण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताकीद देण्यात आली. 

विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत गुन्हेगारांची तपासणी केली गेली, दरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत का याची शहानिशा केली. हद्दीतील १७ ते २० गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक संपत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३० ते ३५ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, दोन वाँटेड आरोपी ताब्यात घेण्यात आले. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ते ३० गुन्हेगारांची तपासणी झाली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समज देण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० ते ३५ आरोपी तपासण्यात आले. फरारी आरोपींच्या घरची तपासणी केली; मात्र आढळून आले नाहीत. 

यादीनुसार आरोपींची तपासणी- गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला शहरातील सात पोलीस ठाण्याच्या वतीने व गुन्हे शाखेतर्फे कोम्बिंग आॅपरेशन केले जाते. कोम्बिंग आॅपरेशनच्या दरम्यान काही आरोपी आढळून येतात; मात्र ज्यांना याची माहिती मिळते व जे पोलिसांना हवे असतात असे आरोपी ४ ते ५ दिवस गायब होतात. कोम्बिंग आॅपरेशन नंतर मात्र आरोपी इतर वेळेत पुन्हा आढळून येतात. गुन्हे शाखेच्या वतीने यावेळी आरोपींची यादी काढली. यादीनुसार आरोपींची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसElectionनिवडणूकPoliticsराजकारण