शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

दहशतवादाविरूद्ध जनतेने पोलिसांचे कान, डोळे व्हावे! दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:43 IST

दहशतवादाच्या विरोधातील लढ्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी पोलिसांसह सामान्य नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आमचे कान आणि डोळे होऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा महाराष्टÑाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

ठळक मुद्देसोलापुरात दोन-तीन महिन्यांपूर्वी नव्यानेच सुरू झालेल्या दहशतवादी विरोधी पथकाचा (एटीएस) विभाग कार्यान्वित झाला दहशतवादाचा प्रश्न काय आहे, त्याला सामोरे कसे जायचे यावर ऊहापोह करण्याच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांशी संवाद साधून एकत्रित संवाद साधण्याचा प्रयत्न असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.दहशतवादाशी निगडीत घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी एटीएस पथक कार्यरत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : दहशतवादाच्या विरोधातील लढ्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी पोलिसांसह सामान्य नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आमचे कान आणि डोळे होऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा महाराष्टÑाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सोलापुरात दोन-तीन महिन्यांपूर्वी नव्यानेच सुरू झालेल्या दहशतवादी विरोधी पथकाचा (एटीएस) विभाग कार्यान्वित झाला आहे. त्याचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने कुलकर्णी सोलापुरात आले होते. यावेळी पोलीस आयुक्तालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. सीमावर्ती भाग असलेल्या सोलापूर शहरात शांतता सुरक्षिततेच्या दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या जागेत एटीएस विभाग कार्यान्वित झाला आहे. दहशतवादाचा प्रश्न काय आहे, त्याला सामोरे कसे जायचे यावर ऊहापोह करण्याच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांशी संवाद साधून एकत्रित संवाद साधण्याचा प्रयत्न असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.दहशतवादाशी निगडीत घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी एटीएस पथक कार्यरत आहे. रेल्वे, लोकलसारख्या ठिकाणी घडणाºया घटनांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. काळानुरुप दहशतवादाच्या संकल्पना बदलल्याचे दिसून येते. १९९३ च्या दशकात घडलेल्या स्फोटामध्ये पाकिस्तानचा सहभाग दिसून येतो. त्याच पुढच्या दशकामध्ये  पाकिस्तानकडून स्वत:हून अंग काढून घेत स्थानिक लोकांकडून दहशतवादाची कारवाई घडवून आणल्याचे पाहावयास मिळते. त्यानंतरच्या २६/११ च्या वेळी भावना दुखावण्याचे काम या मंडळींकडून केले गेले.  महाराष्टÑ शासनाने सायबरचे जाळे सर्वत्र पसरण्याच्या दृष्टीने ८५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज लॅब निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादासारख्या विघातक प्रवृत्तीकडे लोकांचा कल वाढू नये या अनुषंगाने ४ जुलै २०१६ रोजी एक शासन आदेश काढला आहे. यामध्ये अल्पसंख्याक विभागाकडून युवकांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. एटीएस विभागामार्फत दहशतवादाकडे वळू पाहणाºया तब्बल ८६ तरुण-तरुणींना परावृत्त करण्यास यश आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.----------------------सामूहिक प्रयत्नांची गरजगुन्हा दाखल करणे ही शेवटची प्रक्रिया आहे. तत्पूर्वी त्याला दहशतवादासारख्या कारवायापासून परावृत्त करण्याचे काम एटीएस विभाग करतो. आज इंटरनेटच्या माध्यमातून लोकांच्या भावना भडकावण्याचे काम होताना दिसत आहे. त्याला रोखण्याची गरज आहे. यासाठी केवळ एटीएस, पोलीस यांच्यापुरती सिमीत बाब नाही. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. जनतेनेही आपले योगदान देण्याची गरज आहे. सुरक्षेला बाधा येणारी माहिती समजल्यास ती पोलिसांना पुरवून आपले सामाजिक योगदान देण्याची गरज असल्याचे एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस