शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बारलोणीत जमावाकडून पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला खबऱ्याकडून सराफाला लुटणारे आरोपी बारलोणीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक सकाळी ...

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला खबऱ्याकडून सराफाला लुटणारे आरोपी बारलोणीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक सकाळी ११ च्या सुमारास गावात पोहचले. संशयित आरोपी शंकर गोंडीबा गुंजाळ,धनाजी साहेबराव गुंजाळ, दिलीप साहेबराव गुंजाळ हे तिघे गावातील हनुमान मंदिरासमोरील कट्ट्यावर बसलेले दिसले. यावेळी पथकाने अचानक त्यांच्यासमोर गाडी थांबवत त्यातील दोघांना ताब्यात घेतले. परंतु पोलीस पथक असल्याचे आरोपींना कळताच त्यांनी त्यांच्या आपल्या इतर साथीदारांना आरडाओरड करत मला वाचवा, मला वाचवा, पोलिसांच्या तावडीतून सुटका करा म्हणत पथकाशी झोंबाझोंबी केली.

या दरम्यान त्यांचा आवाजाने जवळपास असलेला त्यांच्या नातेवाईकांचा महिलांसह मोठा जनसमुदाय तिथे जमला. पोलीस पथकाच्या गाडीच्या दिशेने त्यांनी दगडफेकीला सुरुवात केली. मोठ्या संख्येने असलेल्या जनसमुदायाकडून दगडफेक होत गेल्याने पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलीस व्हॅनच्या समोर आणि पाठीमागच्या काचा फोडल्या. या झटापटीत पकडलेले दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्यामुळे या हल्ल्यास कारणीभूत ठरलेल्या व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुंजाळ गल्लीतील मुख्य आरोपींसह ११ आरोपी व इतर पन्नास संशयितांविरोधात कुर्डूवाडी पोलिसांत हवालदार धनंजय देविदास गाडे (वय -३२,एलसीबी पोलीस पथक ,सोलापूर) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीनुसार बारलोणी येथील शंकर गोडींबा गुंजाळ, धनाजी साहेबराव गुंजाळ, दिलीप साहेबराव गुंजाळ, सागर साहेबराव गुंजाळ,धनंजय पोपट गुंजाळ, संतोष विनायक गुंजाळ, सुरेश शंकर गुंजाळ, पार्वती पोपट गुंजाळ, साखरबाई दशरथ गुंजाळ, सुभास गुंजाळ, गणेश पोपट गुंजाळ आदींसह पन्नास लोकांविरोधात कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलीस सूत्रांनुसार शुक्रवारी सकाळी ११:१० वाजेच्या दरम्यान सोलापूर ग्रामीणचे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर,महमद इसाक,

पोलीस हवालदार नारायण गोलेकर,धनाजी गाडे,मोहन मनसावले, पोलीस शिपाई अक्षय दळवी, धनराज गायकवाड व समीर शेख यांचे पथक चोरीतील आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी गावात पोहचले. त्यावेळी सर्व आरोपी गावात हनुमान मंदिराच्या कट्ट्यावर बसलेले दिसून आले. यातील दोघांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली. त्यांनी त्यांच्या बोलीभाषेतून गोंधळ घालत नातलगांना बोलावून घेतले आणि दगडफेक सुरु केली.

जमाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोलीस पथक हतबल झाले. या गोंधळातच आरोपींनी पलायन केले. या दरम्यान तिघे पोलीस जखमी झाले.

एसपींची घटनास्थळी भेट

ग्रामीणच्या एलसीबी पथकावर हल्ला होताच संबंधित पथक कुर्डूवाडी पोलिसांत दाखल झाले. त्यांना झाल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. तोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून पोलिसांचा ताफा बारलोणीच्या दिशेने वाटचाल करीत होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासमवेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावाची पाहणी केली.

---

कोंबिंग ऑपरेशन मात्र आरोपी पळाले

आरोपींना पकडण्यासाठी मोहोळ, करमाळा, टेंभुर्णी, बार्शी, माढा येथील अधिकाऱ्यांसह ११० पोलिसांचा फौजफाटा बारलोणी गावात पोहोचला होता. गावाला वेढा टाकला. दिवसभर कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले मात्र आरोपी सापडले नाहीत.

..........