शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसाकडून महिलेवर बलात्कार, सोलापूरातील शहरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:04 IST

तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणत घरात कोणीही नसल्याची संधी साधत अचानक घरात घुसून सोलापूर शहरातील पोलीस कॉन्स्टेबलने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणत घरात कोणीही नसल्याची संधी साधत अचानक घरात घुसून सोलापूर शहरातील पोलीस कॉन्स्टेबलने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ भीमराव उर्फ रामलिंग अरविंद इंगळे (रा़ रामलिंग सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) असे बलात्कार करणाºया पोलीसाचे नाव आहे़ याप्रकरणी यास अटक करून न्यायालयात उभा केले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे़पिडित महिला विवाहित आहे़ घरात एकटीच असल्याने पाहुन पोलीस कॉन्स्टेबल इंगळे याने पिडितेच्या घरात जाऊन तुझ्यावर माझे प्रेम आहे असे सांगून जबरदस्तीने बलात्कार केला़ शिवाय त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे सांगितले़ व्हिडिओ आपल्या पतीस दाखविण्याची धमकी देत वेळोवेळी १५ वेळा बलात्कार केला़ पिडित महिला नोकरीस असून तिच्या घरी कोणी नसताना आरोपीने दमदाटी करून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ २९ एप्रिल २०१६ रोजी आरोपी इंगळे याचा विवाह झाला आहे़ त्याच्या लग्नानंतरही इंगळे हा पिडित महिलेस फोन करीत होता़ पिडित महिला फोन न उचलल्यास तो ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन फोन का उचलत नाही म्हणून त्रास देत असे़ आरोपी इंगळे याने पुन्हा आॅगस्ट २०१७ मध्ये बलात्कार केला़ त्याच्याजवळ चित्रीकरण असल्यामुळे झाला प्रकार कोणाला सांगितला नाही़ १ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिडित महिला नोकरीवर जात असताना आरोपीने पत्रकार भवन येथे अडवून शिवीगाळ करून मारहाण केली़ शिवाय पिडितेच्या पतीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली़ याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़ याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक फुगे हे करीत आहेत़ न्यायालयात आरोपीकडून अ‍ॅड़ श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस