सोलापूर जिल्ह्यातील पुळुज येथे गांजाच्या शेतीवर पोलीसांचा छापा, १२ झाडे जप्त
By admin | Published: April 5, 2017 01:24 PM2017-04-05T13:24:22+5:302017-04-05T13:24:22+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि ५ : पुळूज (ता. पंढरपूर) गावचे शिवारातील जमिन गट नं ३३३/२ मध्ये उसाचे पिकामध्ये सुमारे ३ ते ४ महिन्यापुर्वी विनापरवाना १२ गांजाची झाडांची लागवड करण्या-या सज्जन दशरथ शिंदे (रा.पुळूज ता.पंढरपुर) याच्या विरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य अधिनियम १९८५ चे कलम ८(ब)२०(अ)(ब) प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्या मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहीतीनुसर, सज्जन दशरथ शिंदे याने पुळूज गावत जमिन गट नं ३३३/२ मधील उसाचे पिकामध्ये सुमारे ३ ते ४ महिन्यापुर्वी विनापरवाना १२ गांजाची झाडांची लागवड केली. ही झाडे बेकायदेशीररित्या उत्पन्न घेवुन स्वत:चे फायदयाकरीता विक्री करण्याचे उद्देशाने लावली होती. सोमवारी सकाळी पावणे दहाच्या वाजणेचे सुमारास मिळुन आलेली आहेत व त्याचे उसाचे शेतात छापा घालुन गांज्याची झाडे पोलीसांनी उपटुन जप्त केल्याने तो फरार झालेला आहे. पुढील तपास सपोइ शिंदे करीत आहेत.
--------------------
एवढा माल जप्त...........
जमिन गट नं ३३३/१ मधील उसाचे पिकामध्ये पुळूज (ता.पंढरपुर) मिळाला माल ५३,६००/रुपए त्यात १२ गांजाची हिरवी व ओली झाडे त्यांचे मुळासह व खोडासह वजन एकुण १३ किलो ४०० ग्रम.मिळाला माल ५३,६००/रुपए त्यात १२ गांजाची हिरवी व ओली झाडे त्यांचे मुळासह व खोडासह वजन एकुण १३ किलो ४०० ग्रॅम.