शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील या नगरसेवकाच्या घरावर पोलिसांचा छापा; काय सापडले वाचा बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:14 IST

नगरसेवक सुनील कामाठीच्या घरात सापडली २०० मटका बुकींची नावे

सोलापूर : मटक्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवक सुनील कामाठीच्या घराची गुरुवारी झडती घेण्यात आली. यावेळी कागदपत्रे व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. कागदपत्रांवरून जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २०० बुकींची नावे निष्पन्न झाली आहेत. 

न्यू पाच्छापेठ कोंचीकोरवी गल्ली येथे राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये २४ आॅगस्ट रोजी सुरू असलेल्या मटका बुकींच्या केंद्रावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली होती. धाडीत पोलीस शिपायासह २२ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी, पोलीस शिपाई स्टीफन स्वामी यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी २२ जणांना अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी आणखी सहा ते सात जणांना अटक करण्यात आली आहे. 

गुरुवारी नगरसेवक सुनील कामाठी यांच्या घरी पंचनामा करण्यासाठी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे व त्यांच्या पथकातील पोलीस गेले होते. दरम्यान, त्यांच्या घरातून मटक्यासंदर्भातील विविध कागदपत्रे व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १७ लाईन असल्याचे समजले आहे. सतरा लाईनमध्ये एकूण दोनशे एजंट व त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. निष्पन्न झालेल्या नावावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबंधित एजंटाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यातील सात ते आठ जणांना अटक करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

सुनील कामाठी व इस्माईल मुच्छालेचा शोध सुरूमटक्यातील प्रमुख आरोपी नगरसेवक सुनील कामाठी व इस्माईल मुच्छाले हे दोघे सध्या फरार झाले आहेत. दोघांचे मोबाईल बंद आहेत. गुन्हा दाखल झालेले अन्य आरोपीही सध्या फरार आहेत. कोणत्या एजंटाचा कुठे व्यवसाय सुरू होता. कशा पद्धतीने मटका चालविला जात होता, याची सखोल चौकशी सध्या गुन्हे शाखेच्या पोलिसांमार्फत सुरू आहे. 

गुन्हे दाखल झालेल्यांची माहिती द्या : अभय डोंगरेगुन्हे दाखल झालेले मटक्यातील आरोपी हे सध्या फरार आहेत. यामुळे नगरसेवक सुनील कामाठी इस्माईल मुच्छाले व अन्य लोकांचा समावेश आहे. यातील कोणाचीही माहिती समजल्यास नागरिकांनी माझ्या मोबाईल क्रमांक - ७५०७१३३१०० वर किंवा पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचा मोबाईल क्रमांक- ९९२३१७५१०० वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसfraudधोकेबाजीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका