शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसही लुटणार होळीचा आनंद

By admin | Updated: March 23, 2016 00:18 IST

आजऱ्यातील उपक्रम : पोलिस ठाण्याच्या आवारात पेटणार होळी

ज्योतीप्रसाद सावंत --आजरा -सण, समारंभ म्हणजे पोलिस खात्याच्या कामात वाढ, ठिकठिकाणी बंदोबस्त, गस्त यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव. इतरत्र जल्लोष सुरू असताना ‘कर्तव्य’ बजावताना आपण सर्वांचा इतरांप्रमाणे आनंद लुटू शकत नाही, याची असणारी रुखरुख, याचा कामावर होणारा परिणाम यातून मार्ग काढण्यासाठी आजरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी यावर्षी पोलिस ठाण्यासमोर ‘होळी’ पेटविण्याचा निर्धार केला आहे.कदम म्हणाले, पोलिसांनादेखील इतरांप्रमाणे सण, समारंभात सहभागी होऊन सणाचा आनंद लुटण्याचा अधिकार आहे. सततचे बंदोबस्त व कायदा व्यवस्था सांभाळण्याच्या नादात सण, समारंभापासून त्यांना दूर राहावे लागते. याचा परिणाम म्हणून पोलिसांना मानसिक व कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही आणि कामामध्येही उत्साह राहात नाही.याचा सकारात्मक विचार करून यावर्षीपासून आजरा पोलिस ठाण्याच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत होळी पेटविली जाणार आहे. या उत्सवात आजरा पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी सहभागी होतील. होळीसारख्या उत्साहाने भरलेल्या सणामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतल्यास कुटुंबीयांपासून दूर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना या सणाचा आनंद लुटता येईल, असेही पोलिस उपनिरीक्षक कदम यांनी सांगितले. पहिलाच प्रयोगआजरा पोलिस ठाण्यामध्ये इफ्तार पार्टी वगळता अन्य कोणत्याही सणांशी संबंधित कार्यक्रम होत नाहीत. यावर्षी प्रथमच आजरा पोलिस ठाण्यासमोर होळी पेटणार आहे.