शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट

By admin | Updated: January 24, 2017 20:20 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टआप्पासाहेब पाटील - आॅनलाईन लोकमत सोलापूरबेहिशोबी पैशांची ने-आण, कोणत्याही प्रकारची हत्यारे आणू नयेत, निवडणुकीतील गैरप्रकार, आर्थिक उलाढाल टाळण्यासाठी शहर पोलीस व महानगरपालिका यांच्या संयुक्त टीमने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शहरातील आठ ठिकाणी नाकाबंदी (स्थिर सर्वेक्षक) पथक २४ तास तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) पौर्णिमा चौगुले यांनी दिली़ निवडणुकीच्या निमित्ताने मनपा अधिकारी व शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अलर्ट झाले आहेत़ सोलापूर महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे़ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत़ मतदारांना वश करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत बहुसंख्य उमेदवारांकडून पैशांचा मुक्तहस्ते वापर केला जातो. पैशांबरोबरच मद्य आणि भेटवस्तूही देण्यात येतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या निमित्ताने शहर पोलीस दल व महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी काटेकोरपणे काम करीत आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून स्थिर सर्वेक्षक पथक तयार करण्यात आले आहे़ या पथकासोबत प्रत्येक ठिकाणी सहा बॅरिकेड्स, आठ राहुटी, वायरलेस सेट, शासकीय वाहनांचाही समावेश आहे़ प्रत्येक पथकावर संबंधित पोलीस ठाणे हद्दतील अधिकारी दिवसातून तीन वेळा भेट देऊन योग्य ते मार्गदर्शन करीत आहेत़ -------------------------------हे आहेत महानगरपालिकेकडील अधिकारी़़़़ शहर पोलीस व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्तपणे कामगिरीत फौजदार चावडी पोलीस ठाणे : जे़ आऱमैंढेकर, एस़ए़पारे, वाय़एस़याटकर, डी़डी़सोलनकऱ एमआयडीसी पोलीस ठाणे : एऩएऩपरदेशी, जे़एम़बनसोडे़ सदर बझार पोलीस ठाणे : आऱबी़रंगदाळ, ए़जी़मुर्शद़ जेलरोड पोलीस ठाणे : टी़डी़चिंचुरे, पी़एल़सलगऱ जोडभावीपेठ पोलीस ठाणे : एलक़े़सुरवसे, एस़डी़जाधव़ विजापूर नाका पोलीस ठाणे : एस़एम़आंबुरे, आऱएस़शिंगे़ सलगर वस्ती पोलीस ठाणे : राजेंद्र बिराजदार, जे़डीग़ायकवाड अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ ----------------------दररोजचा अहवाल दररोज सादऱ़़़शहरात सुरू असलेल्या स्थिर सर्वेक्षक पथकास संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील अधिकारी भेट देऊन वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत़ शिवाय उपआयुक्त व सहा़ पोलीस आयुक्त हे दिवसातून तीन वेळा नाकाबंदी ठिकाणास भेटी देत आहेत़ पथकास दिवसातून कोण किती वेळा भेटी दिल्या, याबाबतचा अहवाल रोजच्या रोज उपआयुक्त गुन्हे शाखा यांना सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत़ --------------------या ठिकाणी आहे नाकाबंदी सुरू...फौजदार चावडी पोलीस ठाणे : नवीन पुणे नाका, बार्शी टोल नाका़ एमआयडीसी पोलीस ठाणे : नवीन हैदराबाद नाका़ सदर बझार पोलीस ठाणे : नवीन होटगी नाका़ जेलरोड पोलीस ठाणे : नवीन अक्कलकोट नाका़ जोडभावीपेठ पोलीस ठाणे : नवीन तुळजापूर नाका़ विजापूर नाका पोलीस ठाणे : नवीन विजापूर नाका़ सलगर वस्ती पोलीस ठाणे : नवीन देगाव नाका अशा एकूण आठ ठिकाणांवर स्थिर सर्वेक्षक पथक २४ तास तैनात करण्यात आले आहेत़---------------------२४ तास पोलीस तैनात......४सोलापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरातील आठ ठिकाणी सुरू असलेल्या स्थिर सर्वेक्षक पथक (नाकाबंदी)साठी ५६ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़ यात १६ पोलीस अधिकारी, २४ पोलीस कर्मचारी व १६ वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी असे ५६ पोलीस अधिकारी व कर्मचारी २४ तास तैनात करण्यात आले आहेत़ शिवाय या सर्वेक्षक पथकासोबत व्हिजिट बुक, सूचना पुस्तक, लाईटची व्यवस्था, बॅटरी, हालचाल रजिस्टरही ठेवण्यात आले आहे़ -----------------आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शहरात बेकायदेशीर रोख रक्कम, संशयित वस्तू किंवा शस्त्रास्त्रे यांची वाहतूक होऊ नये याकरिता शहरातील ठिकठिकाणी नाकाबंदी (स्थिर सर्वेक्षक) पथक तैनात करण्यात आले आहेत़ सोलापूर महानगरपालिका निवडणुका शांततेत पार पडतील यासाठी शहर पोलीस सज्ज झाले आहे़ याकामी नागरिकांनीही शहर पोलिसांना सहकार्य करावे़-पौर्णिमा चौगुलेपोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष शाखा), सोलापूर शहऱ-------------------राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील नाक्यावर स्थिर सर्वेक्षक पथक तैनात करण्यात आले आहे़ या पथकामुळे बेकायदेशीर गोष्टींना आळा बसतो आहे़ निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची शहरवासीयांनी काळजी घेऊन शहर पोलिसांना सहकार्य करावे़ युवकांनी निवडणुकीत शांततेची भूमिका घ्यावी अन्यथा भविष्यात नोकरीवर परिणाम भोगावे लागतील़-अपर्णा गीतेपोलीस उपायुक्त, सोलापूर शहऱ