शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात आढळला आशिया खंडातील विषारी दुर्मीळ पोवळा साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:05 IST

या सापाच्या दंशावर लस अद्यापही उपलब्ध नाही; आशिया खंडातील विषारी सापांपैकी सर्वात लहान साप

ठळक मुद्देमहाराष्ट्र, गुजरात, पश्‍चिम बंगाल, तामिळानाडू आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणी त्याचा अधिवासजमिनीखाली, गवत किंवा दगडांच्या खाली तो वास्तव्यास असतोविषदात त्वचेत खोलवर घुसले तर विषबाधा होऊ शकते

सोलापूर : पंधे कॉलनी येथील शरण अळळीमोरे यांच्या घरात अतिशय दुर्मीळ असलेला ‘पोवळा’ साप आढळून आला. या सापाबाबत अधिक माहिती नसल्याने मित्र सोमेश्वर पाटील यांच्या मदतीने सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना व्हाॅट्सॲपद्वारे माहिती दिली. त्यांनी हा साप अतिविषारी पोवळा असल्याचे सांगितले व या सापाला न डिवचता लांबून लक्ष ठेवण्यास सांगितले. काही क्षणातच घटनास्थळाहून या सापास निसर्गात मुक्त करण्यात आले.

पोवळा साप आशिया खंडातील विषारी सापांपैकी सर्वात लहान साप आहे. तोंड काळे, शरीराचा रंग तपकिरी, पोटाकडील भाग पोवळ्यासारखा नारंगी लाल, शेपटीवर दोन काळे ठिपके. डिवचला गेला असता शेपटी गोल करून शेपटीच्या खालील नारंगी भाग प्रदर्शित करून चावण्या आधीची चेतावणी देतो. हा साप अतिशय लहान असल्याने त्याचे विषदंत माणसाच्या रट्ट त्वचेत सहजासहजी टोचत नाहीत. म्हणून या सापाचे दंशाचे प्रमाण खूपच कमी आहे. विषदात त्वचेत खोलवर घुसले तर विषबाधा होऊ शकते.

महाराष्ट्र, गुजरात, पश्‍चिम बंगाल, तामिळानाडू आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणी त्याचा अधिवास आहे. जमिनीखाली, गवत किंवा दगडांच्या खाली तो वास्तव्यास असतो. या सापाच्या दंशावर लस अद्यापही उपलब्ध नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरsnakeसाप