शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

व्हिडीओ गेम खेळा अन् पर्यावरण वाचवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 03:03 IST

मॉरिशसमध्ये पुस्तकातील पर्यावरणाचा धडा मोबाइल गेमवर

- शीतलकुमार कांबळे सोलापूर : मुलांना मोबाईलवरील गेमचे आकर्षण आहे. या गेमच्या माध्यमातून अभ्यास आणि पर्यावरणाचे संवर्धन हे दोन्ही उद्दिष्ट साध्य होऊ शकतात. नेमका हाच विचार वेदा डिन या सोलापूरकर युवतीने करीत ‘इको-वॉरियर्स’ गेम डेव्हलप केला आहे. तिने व तिचा पती ब्रायन डिन यांच्या या प्रयत्नाला आता युनेस्कोदेखील मदत करणार आहे. सध्या मॉरिशसमध्ये सुरू असलेला हा प्रकल्प भारतासह जगभर नेण्याचा वेदाचा मानस आहे.

सहा ते ११ वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘इको-वॉरियर्स’ तयार करण्यात आला आहे. गेमच्या पहिल्या टप्प्यात समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक व इतर कचरा एकत्र केल्यास पॉइंट मिळतात. हा गेम तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आधारित आहे. मॉरिशस सरकारने तेथील विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेटसह हा गेम इन्स्टॉल करून दिला आहे. गेममुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयक जागृती होते. दुसºया टप्प्यात मुलांना आपल्या घरातील प्लास्टिक पुनर्वापरासाठी (रिसायकलसाठी) शाळेत आणून द्यावयाचे आहे.

५ किलो प्लास्टिक दिल्यानंतर विद्यार्थ्यांना इको-वॉरियर कॉमीक बुक मोफत देण्यात येते. या बुकमध्ये बेटावरील प्रवास व प्रदूषणाविरोधातील लढा यांच्या गोष्टी आहेत. तिसºया टप्प्यामध्ये रिसायकल केलेले प्लास्टिक व इतर कचरा वापरावयाचा आहे. ज्या कंपन्यांना प्लास्टिक हवे त्यांना ते देण्यात येते. या कंपन्या त्यांच्या गरजेनुसार दर महिन्याला प्लास्टिक शाळांकडून घेतील. त्याचा वापर रस्त्याच्या किंवा इतर बांधकामात केला जातो.

वेदा डिनचे शालेय शिक्षण सोलापुरात

वेदा डिन या विद्या लोलगे यांची मुलगी आहे. वेदाचे दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापुरातील लिटील फ्लॉवर शाळेत झाले. पुण्यात आल्यानंतर आर्ट आणि डिझाईन कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. त्यानंतर आपल्या कलेला आणखी मोठे विश्व उघडता यावे यासाठी बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१४ मध्ये पुण्यात कंपनीची सुरुवात केली. या कंपनीचे मुख्य कार्यालय आता मॉरिशसमध्ये आहे. वेदाच्या या कामगिरीमुळे तिला ‘फिमेल रोल मॉडेल २०१९’ हा साऊथ आफ्रिका स्टार्टअप पुरस्कार देण्यात आला.2,00,000 मुलांचा सहभाग

युनेस्कोने १९ जून, २०१९ रोजी या संदर्भात करार केला असून, ४१७ खासगी आणि सरकारी शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. ६ ते ११ वर्षे वयोगटांतील सुमारे २ लाख विद्यार्थी सध्या हे अ‍ॅप वापरत आहेत. कचरा गोळा करण्याची प्रक्रिया ख्रिसमसनंतर सुरू होणार आहे.आपल्या देशामध्ये प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. यावर आळा घालायचा असेल, तर लहान मुलांना त्यांच्या शालेय जीवनातच पर्यावरणाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. याचा विचार आमच्या मनात आला. मुलांना गेमचे आकर्षण असल्याने याच मार्गाचा वापर केला. एखाद्या व्हिडीओ गेमला युनेस्कोने सहकार्य करणे ही पहिलीच वेळ आहे.- वेदा डिन, प्रशासकीय संचालक, पांडा अँड वोल्फ होल्डिंग.

टॅग्स :Solapurसोलापूरtechnologyतंत्रज्ञान