शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन कोलमडले, सोलापूर शहरातील हद्दवाढ भागात पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 18:13 IST

एकीकडे स्मार्ट सिटी एरियात दररोजच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे तर दुसरीकडे हद्दवाढ विभागाला वाºयावर सोडण्यात आले आहे. 

ठळक मुद्देउन्हाचा कडाका वाढल्यामुळे शहरातील पाण्याची गरज वाढली चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असतानाही पाण्याचे नियोजन कोलमडलेआठ दिवसांपासून हद्दवाढ भागात कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा

सोलापूर : ऐन रंगपंचमी सणावेळी शहर व हद्दवाढ विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. एकीकडे स्मार्ट सिटी एरियात दररोजच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे तर दुसरीकडे हद्दवाढ विभागाला वाºयावर सोडण्यात आले आहे. 

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शहरातील पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असतानाही पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. गेल्या आठ दिवसांपासून हद्दवाढ भागात कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. चार दिवसांनी पाणी येते व तेही कमी वेळ यामुळे नागरिकांची पंचाईत होत आहे. उन्हाळ्यात पिण्यासाठी चार दिवस पाण्याचा साठा करून ठेवणे अवघड होत आहे. असे असताना पाणीपुरवठा अवेळी व कमी दाबाने केला जात आहे. पाणी कमी दाबाने येणार याची कल्पना दिली जात नाही. 

मंगळवार, ६ मार्च रोजी रंगपंचमी असताना सोमवारी हद्दवाढ भागात ज्या विभागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागात कमी दाबाने पाणी देण्यात आले. अशात पुन्हा सोमवारी टाकळी पंपगृहास वीज मंडळाकडून वीजपुरवठा खंडित झाल्याच्या कारणावरून सणादिवशीही शहर व हद्दवाढ भागात पाणीपुरवठा उशिरा व कमी वेळ व कमी दाबाने होणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरडा रंग खेळून सहकार्य करावे, असे मनपातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या गावठाण भागात दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. इकडे मात्र हद्दवाढ भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकायची वेळ आली आहे. हद्दवाढ भागाचेही पाणी वितरणाचे नियोजन व्यवस्थित करावे, अशी मागणी नगरसेवक राजेश काळे यांनी केली आहे.----------------सोमवारी टाकळी, पाकणी आणि मेडिकल पंपगृहाचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. त्यामुळे पाण्याचा पुरेसा उपसा न झाल्याने शहर व हद्दवाढ भागात पाणीपुरवठा वेळेवर झाला नाही. मंगळवारीही हीच परिस्थिती राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.- गंगाधर दुलंगे, सार्व. आरोग्य अभियंता

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका