शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणातील आरोपी पोलीसच निघाला पिस्तूलचोर, ३१ पोलिसांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 02:14 IST

पोलीस शस्त्रागारातून गायब झालेल्या दोन पिस्तुली मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दत्तात्रय गोरख भोसले याच्या निवासस्थानी सापडल्या. भोसले सध्या मावस भावाच्या खूनप्रकरणी कर्जत (जि. नगर) पोलिसांच्या अटकेत आहेत.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पोलीस शस्त्रागारातून गायब झालेल्या दोन पिस्तुली मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दत्तात्रय गोरख भोसले याच्या निवासस्थानी सापडल्या. भोसले सध्या मावस भावाच्या खूनप्रकरणी कर्जत (जि. नगर) पोलिसांच्या अटकेत आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान, परवानाधारकांकडून ६८ शस्त्रे जमा केली होती. त्यामध्ये ५० बंदुका, १५ रिव्हॉल्व्हर व ३ पिस्तुली होत्या. यामधील दोन पिस्तुली सात महिन्यांपूर्वी पोलीस कस्टडीतून गायब झाल्या होत्या. पिस्तूलधारक अनिल गायकवाड व नवीनकुमार विग यांनी पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे तक्रार केली होती. सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर १६ आॅगस्ट रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या पथकाने शुक्रवारी दुपारी दत्तात्रय भोसले याच्या पोलीस लाइनमध्ये असलेल्या निवासस्थानाची झाडाझडती घेतली. या वेळी किचनवरील माळ्यावर दोन फूट लांबीचे काळ्या रंगाचे पिस्तूल मिळून आले. याबाबत भोसले यांच्या पत्नीकडे विचारणा केली असता, मिलिट्रीमधील नातेवाईकांचे असल्याचे सांगितले.पोलिसांनी दुसºया खोलीची झडती घेतली असता, धान्याच्या पेटीत बंद पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये दोन शस्त्रे मिळून आली. दोन पिस्तुलांचा तपास सुरू असताना, तिसरे पिस्तूल मिळून आल्याने, तपास पथकाला आश्चर्याचा धक्का बसला.३१ पोलिसांनी घेतला सुटकेचा नि:श्वासपोलीस ठाण्यातील लॉकअप गार्डमधून पिस्तूल चोरीस गेल्यामुळे, त्या दिवशी कर्तव्यावर असणाºया पोलीस अधिकाºयाबरोबर ३१ पोलीस कर्मचाºयांना चौकशीला सामोरे जाण्याची वेळ आली होती. निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडून कारवाई होईल, याची बºयाच पोलीस कर्मचाºयांनी धास्ती घेतली होती. अखेर या पिस्तूलचोरी प्रकरणाचा उलगडा झाल्याने, ‘त्या’ ३१ पोलीस कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.