शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

तुरीचा मालट्रक पळविणारी टोळी जेरबंद, २६२ पोत्यांसह १३ लाख ७४ हजार ७९६ चा मुद्देमाल जप्त, सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 09:29 IST

मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथून चालकास मारहाण करून २६२ तुरीचे पोते व ४३०० रुपयांच्या रोख रकमेसह मालट्रक पळविणाºया टोळीस ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई दि. ३ जानेवारी रोजी करण्यात आली. 

ठळक मुद्देहुलजंती फाटा येथे सापळा रचला असता संशयितांची जीप तेथे आली. त्यांना अडवून चौकशी केली असता मालट्रक पळवून नेल्याची कबुली दिलीया प्रकरणी अशोक बबन निळे, पैगंबर सिकंदर शेख, संभाजी वसंत ननवरे, दत्ता रायगोंडा बंडगर यांना अटक एकूण १३ लाख ७४ हजार ७९६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूरदि ६ : मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथून चालकास मारहाण करून २६२ तुरीचे पोते व ४३०० रुपयांच्या रोख रकमेसह मालट्रक पळविणाºया टोळीस ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई दि. ३ जानेवारी रोजी करण्यात आली. अशोक बबन निळे (व्हसपेठ, ता. जत, सांगली), पैगंबर सिकंदर शेख (वय २७, तासगाव फाटा, ता. मिरज, जिल्हा सांगली), संभाजी वसंत ननवरे (२४), दत्ता रायगोंडा बंडगर (वय २५, माडग्याळ, ता. जत, जिल्हा सांगली), दादासोा पडोळकर (रा. कुलाळवाडी, ता. जत, जिल्हा सांगली) अशी आरोपींची नावे आहेत.  नंदकुमार सयाजीराव शिंदे (रा. मळनगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक (क्र.एम.एच.१० झेड-२३०४) मध्ये तुरीचे पोते घेऊन जत येथून सोलापूरकडे येत होते. ट्रक बेगमपूर येथे आला असता पाठीमागून बोलेरो जीपने मालट्रकला अडवले. नंदकुमार शिंदे यांना मारहाण करीत त्यांच्याजवळील ४ हजार ३०० रुपये रोख, मोबाईल हॅण्डसेट काढून घेतले व मालट्रक पळवून नेला. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेकडील विशेष पथक अज्ञात गुन्हेगारांच्या मागावर असताना पो.नि. विजय कुंभार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपींनी व्हसपेठ, ता. जत, जि. सांगली येथील अशोक निळ व त्यांच्या साथीदारांनी हा गुन्हा केला आहे. त्याप्रमाणे पो.नि. कुंभार, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख, बाबुराव म्हेत्रे व कर्मचाºयांनी टोळीचा माग काढला. दि. २ जानेवारी रोजी आरोपी मंगळवेढा तालुक्यातील उमदी भागात असल्याची माहिती समजली. त्यानुसार हुलजंती फाटा येथे सापळा रचला असता संशयितांची जीप तेथे आली. त्यांना अडवून चौकशी केली असता मालट्रक पळवून नेल्याची कबुली दिली. या प्रकरणी अशोक बबन निळे, पैगंबर सिकंदर शेख, संभाजी वसंत ननवरे, दत्ता रायगोंडा बंडगर यांना अटक करण्यात आली आली व त्यांच्याकडून ४ लाख २४ हजार २९६ रुपये किमतीच्या २१३ तुरीची पोती, ४ लाख रुपये किमतीची बोलेरो जीप व ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा गुन्ह्यातील चोरीस गेलेला मालट्रक व ५०० रुपये किमतीचे एअरगन असा एकूण १३ लाख ७४ हजार ७९६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास सपोनि बल्लाळ करीत आहेत.

 सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख, बाबुराव म्हेत्रे, पोह. नारायण गोलेकर, गोरखनाथ गांगुर्डे, दिलीप राऊत, पो.कॉ. सागर शिंदे, सचिन मागाडे, व्यंकटेश मोरे, मनीष पवार, इस्माईल शेख, दीपक जाधव यांनी केली.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस