शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सोलापुरातील स्मार्ट सिटी कामांना विलंब करणाºया ठेकेदारांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:41 IST

दर आठवड्याला कामाच्या शिल्लक रकमेवर ०.५ टक्क्यानुसार दंडात्मक कारवाई सुरू .

ठळक मुद्देरंगभवन चौकाचे काम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा शब्द गेल्या दोन महिन्यात ठेकेदारांना पावणेतीन लाख रुपयांचा दंड दोन ठेकेदारांना सोलापूर स्मार्ट सिटी कॉर्पाेरेशन कंपनीने दंडात्मक कारवाई सुरू केली

सोलापूर : रंगभवन चौक आणि होम मैदान सुशोभिकरणाच्या कामाला विलंब लावणाºया दोन ठेकेदारांना सोलापूरस्मार्ट सिटी कॉर्पाेरेशन कंपनीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यात या ठेकेदारांना पावणेतीन लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. काम पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला कामाच्या शिल्लक रकमेवर ०.५ टक्क्यानुसार दंडात्मक कारवाई सुरू राहील, अशी माहिती मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

स्मार्ट सिटी योजनेतून रंगभवन चौकात अर्बन प्लाझा विकसित करण्यात येत आहे. यासाठी ४ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद असून हे काम राजश्री कन्स्ट्रक्शन मुंबई ही कंपनी करीत आहे. जुलैअखेर  काम पूर्ण करण्याची मुदत होती. ठेकेदाराने वेगवेगळी कारणे देऊन आॅगस्टअखेर काम पूर्ण होईल, असे सांगितले, परंतु कामाला विलंब होत राहिला. २ आॅक्टोबर रोजी ही तारीख देण्यात आली. तरीही काम पूर्ण न झाल्याने राजश्री कन्स्ट्रक्शनला जुलै ते आॅक्टोबर या दरम्यान सादर करण्यात आलेल्या बिलांमध्ये १ लाख ७५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. 

होम मैदानाच्या सुशोभिकरणाचे काम निखिल कन्स्ट्रक्शन पुणे यांना मिळाले. यासाठी २ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद आहे. आॅक्टोबरअखेर ही कामाची मुदत होती. होम मैदानाला लोखंडी कंपौंड, वॉकिंग ट्रॅक, हायमास्ट, पार्किंग व्यवस्था अशी कामे करण्यात येत आहे. हे कामही मुदतीत पूर्ण न झाल्याने निखिल कन्स्ट्रक्शनला १ लाख २२ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.  सध्या कंपौंडचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. हायमास्टही बसविण्यात आले आहेत. नोव्हेंबरअखेर काम पूर्ण करण्यात यावे, असे आदेश स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने निखिल कन्स्ट्रक्शनला दिले आहेत, परंतु मुदतीत काम होईल याबद्दल साशंकता आहे.

मागील वर्षी गड्डायात्रेमुळे स्मार्ट रोडचे काम बंद ठेवण्यात आले होते. यानंतर ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. डिसेंबर २०१८ अखेर त्याने हे काम पूर्ण करायचे आहे. ते शक्यही आहे. त्याची क्षमता त्याने दाखवणे गरजेचे आहे. रंगभवन चौकाचे काम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा शब्द देण्यात आला आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई सुरू राहील. -डॉ. अविनाश ढाकणे, सीईओ, सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोेरेशन. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी