शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पासपोर्ट कार्यालयामुळे सोलापूरचे पर्यटन वाढेल, अतुल गोतसुर्वे

By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 11:03 IST

सोलापूर दि २९ : सोलापूर शहर हे झपाट्याने बदलू लागलंय़ स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेतेय. त्यातच सोलापूरला होत असलेलं पासपोर्ट कार्यालय म्हणजे देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेलच पण सोलापूरसाठी ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकेल,

ठळक मुद्देसोलापूर शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेतेय. सोलापूरच्या कार्यालयाला सध्या सहा जिल्हे जोडलेपासपोर्ट प्रक्रिया जलद झाली तर परदेशी चलन आणण्यात वाढ

बाळासाहेब बोचरे : आॅनलाइन लोकमतसोलापूर दि २९ : सोलापूर शहर हे झपाट्याने बदलू लागलंय़ स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेतेय. त्यातच सोलापूरला होत असलेलं पासपोर्ट कार्यालय म्हणजे देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेलच पण सोलापूरसाठी ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकेल, असे प्रतिपादन सोलापुरात होणाºया पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख अतुल गोतसुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.सोलापूर येथे शनिवारी अद्ययावत पासपोर्ट कार्यालय सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता पासपोर्ट कार्यालयामुळे सोलापुरात लवकरच अनेक बदल झालेले पाहायला मिळतील, असे गोतसुर्वे म्हणाले. मूळचे चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील असलेले गोतसुर्वे यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये झाले असून, पुढील शिक्षण पुण्यात झाले. २००४ साली ते भारतीय विदेश सेवेत दाखल झाले.पासपोर्ट असणे हे आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम असून, तो आपला मूलभूत हक्क आहे. यामुळे आपण कधीही पर्यटन, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकतो. अनेक आयटी कंपन्या किंवा इतरही व्यावसायी चांगल्या कंपन्या पासपोर्ट असल्याशिवाय नोकरी देत नाहीत. त्यामुळे पासपोर्ट ही आवश्यक बाब बनली आहे. सोलापूरच्या कार्यालयाला सध्या सहा जिल्हे जोडले असले तरी आणखी जिल्हे जोडले जाण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड व कोल्हापूर येथे पासपोर्ट कार्यालय आहे़ पण पुण्याच्या तोडीचे कार्यालय पुण्यानंतर सोलापुरातच झाले आहे. या सहा जिल्ह्यांतील कोणाही नागरिकाला जे कार्यालय सोयीचे वाटेल त्या ठिकाणी जाऊन ते अर्ज करु शकतात. विशेषत: सोलापूरसह नगर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांना सोलापूर सोयीचे होऊ शकते, असे गोतसुर्वे म्हणाले.केरळसारखे राज्य परकीय चलन आणणारे मोठे राज्य आहे. या राज्यातून आखाती देशात जाणाºयांची संख्या मोठी आहे. महाराष्टÑातूनही पासपोर्ट प्रक्रिया जलद झाली तर परदेशी चलन आणण्यात वाढ होऊ शकते. सोलापूरला त्याचा फायदा होऊ शकतो, असे सांगून आॅनलाईन अर्ज केल्यानंतर कागदपत्रे तपासल्यापासून एक ते ४० दिवसांत नागरिकाला पासपोर्ट मिळू शकतो, असे गोतसुर्वे म्हणाले.-----------------पासपोर्ट मिळविण्याची प्रक्रिया अशी़़़- पासपोर्ट कार्यालयात थेट येता येणार नाही. त्यासाठी अगोदर आॅनलाईन अर्ज करावा लागतो. आणि भेटीची वेळ आणि दिवस निश्चित केला जातो. आॅनलाईन अर्जाची प्रत दाखवणाºयांनाच भेट दिली जाते.- ही प्रक्रिया दि. २८ जुलैच्या दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झाली आहे. त्यासाठी ६६६.स्रं२२स्रङ्म१३्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर जाऊन आपण आॅनलाईन अर्ज करु शकता. किंवा १८००२५८१८०० या टोल फ्री क्रमांकावर डायल करुन माहिती घेऊ शकता. मुलांसाठी एक हजार तर प्रौढांसाठी १५०० रुपये पासपोर्ट शुल्क असून, ते आॅनलाईन भरल्यानंतर त्याची पावती घेऊन दिलेल्या तारखेदिवशी कार्यालयात आपली कागदपत्रे दाखल करण्यासाठी यावे लागते.- कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर पोलिसांकडून अहवाल मागवला जातो. ज्या व्यक्तीची चौकशी करण्याची गरज नाही असे वाटते त्यांना एक दिवसातही पासपोर्ट मिळू शकतो. अन्यथा ४० दिवसांत पासपोर्ट देण्याची प्रक्रिया पूर्ण होते.-------------------------बदलत्या सोलापूरला पासपोर्ट कार्यालय व्हावे ही आपली मनोमन इच्छा होती. विदेश सेवेत असल्याने त्याचा आपण पाठपुरावा केला. सोलापूरचे लोकप्रतिनिधीही पाठपुराव्यात कमी पडले नाहीत. सर्वांच्या प्रयत्नाने हे कार्यालय झाल्याचा मनोमन आनंद होत असून, जन्मगावासाठी काहीतरी केल्याचे समाधान व अभिमान वाटत आहे़-अतुल गोतसुर्वे, प्रमुख, सोलापूर पासपोर्ट कार्यालय