शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनी दिली ‘शिवशाही’ला पसंती, दोन गाड्यांची झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 14:37 IST

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अधिकाधिक तत्पर आणि अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सुरु केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित सेवेला पसंती दिल्याचे दैनंदिन प्रवासी भारमानावरुन दिसू लागले आहे.

ठळक मुद्देआणखी पाच गाड्यांसाठी मागणी करण्यात आल्याची माहिती अश्वजीत जानराव यांनी दिली.१ सप्टेंबर रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारासाठी पहिली शिवशाही बस मिळालीशहरी भागात सेवा गतिमान करताना ग्रामीण भागात धावणाºया बसकडेही लक्ष द्यावे.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अधिकाधिक तत्पर आणि अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सुरु केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित सेवेला पसंती दिल्याचे दैनंदिन प्रवासी भारमानावरुन दिसू लागले आहे. प्रवाशांची ही निकड लक्षात घेऊन महामंडळाने सोलापूर आगारासाठी आणखी दोन बसची पुण्याला जाण्यासाठी सोय केली आहे. लवकरच आणखी पाच गाड्यांसाठी मागणी करण्यात आल्याची  माहिती जिल्हा वाहतूक अधिकारी अश्वजीत जानराव यांनी लोकमतशी बोलताना दिली.१ सप्टेंबर रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारासाठी पहिली शिवशाही बस मिळाली. प्रवाशांकडून पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. सोलापूर-पुणे दैनंदिन ये- जा करणारा प्रवासी वर्ग सोलापुरात मोठ्या प्रमाणात आहे. ही निकड लक्षात घेऊन ही बस सुरु झाली आणि पाहता पाहता दोन महिन्यांत या बसने प्रवाशांना आपलेसे केले. हा प्रतिसाद पाहून सोलापूर आगारातून आणखी दोन बसची सोय करण्यात आली आहे. सोलापुरातून पहिली बस सकाळी ७ वाजता आणि नव्याने सुरु झालेल्या दोन गाड्यांमध्ये एक सकाळी ९ आणि दुसरी ११ वाजता सोडण्यात आली आहे. याच गाड्या स्वारगेटहून परत सोलापूरकडे प्रवाशांना घेऊन परततात. सध्या या तिन्ही गाड्यांमध्ये सरासरी ६० ते ६५ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. दैनंदिन पुण्याकडे जाणाºया बसचे भारमान ५७ ते ५८ टक्के आहे. शिवशाहीचे हे प्रमाण त्यातुलनेत अधिक आहे. लांबपल्ल्याचा प्रवास करताना सुरक्षित आणि तत्पर सेवेला प्रवासी नेहमीच पसंती देतात. हा विचार करुनच सोलापूर आगारातून ही सुविधा देत असल्याचे जानराव यांनी स्पष्ट केले. आगामी काळात आणखी ५ गाड्या महामंडळाकडे मागवण्यात येणार आहेत. दरम्यान लवकरच  दोन गाड्या येणार असून, तपासणीसाठी त्या प्रलंबित आहेत. प्रवाशांनी प्रवासकाळात समस्या जाणवल्यास सोलापूर विभागाशी संपर्क साधावा, त्यांचे निराकरण केले जाईल, अशी ग्वाही दिली. याशिवाय दैनंदिन बससंदर्भातही प्रवाशांसाठी लांबपल्ल्याच्या असो व ग्रामीण भागात धावणाºया बस अधिक सुरक्षित आणि तत्पर सेवा देण्यासाठी विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्या अधिपत्याखाली सर्व अधिकारी, चालक, वाहक, यांत्रिक विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. ---------------------------ग्रामीण भागाकडे लक्ष द्याच्प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत सेवा देणाºया महामंडळाने शहरी भागात सेवा गतिमान करताना ग्रामीण भागात धावणाºया बसकडेही लक्ष द्यावे. अनेकवेळा ग्रामीण भागातील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडते. याचाच परिणाम प्रवासी खासगी वाहनांकडे वळतात. नवनवीन योजना कार्यान्वित करताना मूलभूत सेवा पुरवण्याकडे लक्ष पुरवावे, अशी  मागणी प्रवाशांमधून होत आहे. --------------------------बसमधील सुविधा...........संपूर्ण वातानुकूलित बस. प्रत्येक आसनाला कंट्रोल बटनदोन बाय दोन पुशबॅक आसनेप्रत्येक खिडकी आसनाजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंटआतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकरउत्कृष्ट सस्पेंशन, सूचनेसाठी चालकाकडे माईक व्यवस्थाबसच्या पुढे-मागे एलईडी डिस्प्लेमोठे सामान/पार्सलसाठी डिक्की

टॅग्स :Solapurसोलापूर