शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलांबरोबर पालकही रांगेत;  दाखल्यांसाठी सेतू कार्यालयं होताहेत हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 18:49 IST

शैक्षणिक दाखले काढण्यासाठी गेल्या आठवडाभरात सेतू कार्यालयात गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली

सोलापूर : कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अशा काळातही शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक दाखले काढण्यासाठी गेल्या आठवडाभरात सेतू कार्यालयात गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली. मुलांबरोबर पालकही रांगेत उभे राहिलेले दिसले. मागील सव्वा वर्षात जवळपास एक लाख दाखल्यांचे वितरण झाले आहे.

मागील वर्षी फेब्रुवारीपासून कोरोनाचा कहर सुरू झाला. मार्चनंतर पूर्ण लॉकडाऊन लागू झाला. त्यानंतर तीन महिने सेतू कार्यालय बंद होते. ऑक्टोबरनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होतील, अशी अपेक्षा होती; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर २०२१ मध्येही शाळा व महाविद्यालये सुरू झाली नाहीत. निर्बंधात कमी-अधिक प्रमाणात शिथिलता येत असल्यामुळे भविष्यात शाळा व महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी अपेक्षा असल्यामुळे अनेकजण शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करून घेत आहेत. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. सर्वाधिक ५५ हजार ६७० प्रतिज्ञापत्रांचे वितरण झाले आहे. त्यानंतर पाच हजार जाती दाखल्यांचे वितरण झाले आहे. १३ हजार २६० उत्पन्न दाखले तर ३ हजार ५०६ रहिवासी दाखल्यांचे वितरण झाले आहे.

कोरोना नियमांचे पालन

मागील महिनाभरापासून विविध दाखल्यांसाठी नागरिक सेतू कार्यालयात येत आहेत. फिजिकल डिस्टन्स पाळून दाखल्यांचे वितरण होत आहे. सॅनिटायझरचाही वापर होतोय, असे सेतू केंद्र चालकांनी सांगितले.

 

 

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षण