शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सोलापूरच्या ‘ब्ल्यू व्हेल’ ने पालक हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 8:31 PM

सोलापूर : अंधेरीतील आत्महत्या प्रकरण आणि जगात खळबळ माजलेल्या ‘ब्ल्यू व्हेल’ गेमचे लोण सोलापुरात पोहोचल्याने पालक हादरले असून, पाल्याच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संकटावर उपाय म्हणून पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या स्तरावर जनजागरणासाठी सरसावल्या आहेत. दरम्यान, याच मुद्यावर लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी १ आॅगस्ट रोजी आपल्या फेसबुक पेजवर व्यक्त केलेली पोस्ट पालकांना जागे करण्याची होती असेच म्हणावे लागेल.

ठळक मुद्देजुळे सोलापुरातील १४ वर्षांचा मुलगा यात अडकल्याचे उघडकीस पालकांना सतर्क राहावे लागणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरविलास जळकोटकर/अमित सोमवंशी सोलापूर : अंधेरीतील आत्महत्या प्रकरण आणि जगात खळबळ माजलेल्या ‘ब्ल्यू व्हेल’ गेमचे लोण सोलापुरात पोहोचल्याने पालक हादरले असून, पाल्याच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संकटावर उपाय म्हणून पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या स्तरावर जनजागरणासाठी सरसावल्या आहेत. दरम्यान, याच मुद्यावर लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी १ आॅगस्ट रोजी आपल्या फेसबुक पेजवर व्यक्त केलेली पोस्ट पालकांना जागे करण्याची होती असेच म्हणावे लागेल.सोशल मीडिया माध्यमातून ‘ब्ल्यू व्हेल’ गेमबद्दलची चर्चा गाजत असताना बुधवारी जुळे सोलापुरातील १४ वर्षांचा मुलगा यात अडकल्याचे उघडकीस आले. सोलापूर ग्रामीण पोलील दलातील अमोल यादव, भिगवण पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने हा मुलगा सुखरुप त्यांच्या आई-बाबांना मिळाला; मात्र तमाम पालक हादरले आहेत. पोलीस प्रशासनानेही तातडीने या गेमचे गांभीर्य ओळखून शहर आणि जिल्ह्यात शाळांमध्ये मुलांमध्ये जनजागरण करण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश देण्यात आले आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय असलेली संभाजी ब्रिगेडही या प्रश्नावर प्रबोधनाचा जागर करणार असल्याचे शहराध्यक्ष शाम कदम यांनी सांगितले.गर्भश्रीमंत, उच्चभ्रू पालकांच्या किशोरवयीन मुलांकडे स्मार्ट फोन हाती असल्यामुळे अनाकलनीय वयात त्यांच्याकडून अनेक गोष्टी सहजपणे घडून जाताहेत. आपल्या पश्चात आपला मुलगा काय करतो, याकडे लक्ष द्यायलाही त्यांना फुरसत नसते. शिवाय अनेक घरांमध्ये आई-वडील आणि पाल्यांमधला संवादही हरवत चालला आहे. यातूनच मुलं एकलकोंडी बनून ‘ब्लू व्हेल’सारख्या गेमचा शिकार बनतात. मुंबईत अशा प्रकारातून घडलेली घटना ताजी असतानाच सोलापुरातही असा प्रकार बुधवारी उघडकीस आल्याने अनेक पालकांना सतर्क राहावे लागणार, अशा बोलक्या प्रतिक्रिया पोलीस प्रशासनातील अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, पालकांनी  ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. ---------------------------पालकांनो, इकडे लक्ष द्या! ४हरवलेल्या संवादामुळे मुलांचा होणारा कोंडमारा आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न टाळण्यासाठी आपली मुलं काय करतात, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्यांना पुरवण्यात आलेले स्मार्ट फोन, लॅपटॉप यासारख्या तत्सम वस्तूंची अधून-मधून तपासणी करा. काय करावे आणि करू नये याची दक्षता घ्यावी. समजा ब्लू व्हेल असेल अथवा अन्य कोणत्या घटनांमध्ये अडकून त्यांचे मानसिक संतुलन विचलित झाले असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी, मैदानी खेळाकडे आकृष्ट होण्यासाठी उद्युक्त करावे अश्या टिप्स् राज्याचे सायबर क्राईमचे पोलीस अधीक्षक बालसिंग रजपूत यांनी पालकांना दिल्या आहेत.--------------------सोसायट्यांमध्ये क्लब तयार व्हावेत : डॉ. बोराडे४साधारण १२ ते १४ वयोगटातील किशोरवयीन, पौगंडावस्थेत मुलांमध्ये एखादी मनासारखी गोष्ट न घडली की एकटेपणाची भावना निर्माण होते. ज्या घरांमध्ये आई-वडील नोकरी व अन्य कामानिमित्त बाहेर असतात, अशा घरातील मुलांचा संवाद होत नाही. मुलं एकलकोंडी होतात. इंटरनेट, टी. व्ही., स्मार्ट फोनच्या माध्यमातून अनेक गेम मुलांना भुरळ टाकतात. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होताहेत. यासाठी पालकांनी आता मुलांसाठी वेळ द्यायला हवा. त्यासाठी वेळापत्रक ठरवावे लागेल. शिवाय आपली मुलं काय करताहेत याचा कानोसा घ्यायला हवा. सोसायट्यांमधील पालकांनी क्लब स्थापन करून त्या माध्यमातून मुलांचा अभ्यास, खेळ यासाठी सुविधा उपलब्ध केल्यास त्यांचे लक्ष अन्यत्र विचलित होणार नाही. यामुळे मुलांचा एकलकोंडेपणा कमी होईल, त्यांची चिडचिड कमी होऊ शकेल, असा विश्वास मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आतिश बोराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.----------------------------माहिती-तंत्रज्ञानाच्या मायाजालामध्ये संवाद हरवलेली मुलं अडकून ‘ब्लू व्हेल’सारख्या गेममध्ये अडकली जात आहेत. सोलापुरातही उघडकीस आलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम विभागाला अधिक सक्षम राहण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळांमधील मुलांसाठी विशेष अभियान राबवून जनजागरण करण्याच्या सूचना देत आहोत. पालकांनीही दक्ष राहावे. - महादेव तांबडे, पोलीस आयुक्त, सोलापूर-------------------------जनतेमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत नेहमीच प्रयत्न केले जातात. बदलत्या प्रवाहात ब्लू व्हेल वा अन्य गेमच्या माध्यमातून निर्माण होणाºया प्रश्नांवरही अधिक लक्ष देण्याची गरज ओळखून याबद्दल विविध शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकाºयांना सूचना देत आहोत. सायबर क्राईमच्या विभागालाही याबद्दल सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, याची तातडीने अंमलबजावणी होईल. - एस. वीरेश प्रभूपोलीस अधीक्षक, सोलापूर----------------------पालकांनो सोशल मीडियावर मुलांना जपा४अंधेरी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्यानंतर 'ब्ल्यू व्हेल' गेमचा मुद्दा भारतात चर्चेला आला आहे. ब्ल्यू व्हेल या गेममध्ये मुला-मुलींना सोशल मीडियावरून संपर्क करण्यात येतो. यात दररोज एक याप्रमाणे ५० दिवस काही काम करण्यास सांगितले जाते. जसे की आज रात्री बारा वाजता उठा, उद्या सकाळी अमुक टेकडी चढा, परवा काय तर अमुक हॉरर चित्रपट बघा, अशी कामे दररोज करण्यास सांगितले जाते. अखेर शेवटच्या दिवशी सहभागींना आत्महत्या करण्याचे आवाहन गेमद्वारे केले जाते. त्यानुसार जगभरात अनेक मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. हे संकट आता आपल्या दाराशी आले आहे.आज  महाराष्ट्र विधानसभेत सुद्धा हा मुद्दा चर्चेल आला असून, मुंबईतील घटनेची चौकशी करून आणि हा खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्रसरकारशी चर्चा करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.तेव्हा पालकांनो आपली मुले सोशल मीडियावर काय करतात, याकडे सतत लक्ष ठेवणे जरूरीचे आहे.