शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

आता नाचत पंढरी जाऊ रे खेळीया; पुरंदावडे येथे माऊलींच्या पालखीचे रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 07:26 IST

अकलूजमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण पार पडले.

सोलापूर : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सकाळी पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीचा पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी सात तोफांची सलामी देऊन जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर अकलूज मधील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानात पालखीचे गोल रिंगण पार पडले. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे रिंगण पार पडले.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अश्व दुपारी २.१५ वाजता रिंगण मैदानावर पोहोचले, तर पालखी दुपारी २.४८ वाजता पोहोचली. पालखी रिंगण मार्गाला प्रदक्षिणा घालून मध्यभागी विसावली पादुकांची व अश्वाची पूजा मान्यवरांनी केली. देवीदास लोखंडे यांनी जरीपटक्यासह तीन प्रदक्षिणा मारल्या व ३.४८ वाजता रिंगण सोहळा सुरू झाला. दोन फेऱ्या मारत ४ वाजता अश्वांची दौड थांबली. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पायी चालत सोहळ्यात सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व समितीचे इतर पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन परंपरेप्रमाणे हे आमंत्रण दिले. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी निमंत्रण देतानाच मुख्यमंत्री शिंदे यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार केला. पंढरपूर प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यावेळी उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींमुळे केवळ २२ दिवसांच्या अंतराने दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना या महापूजेचे आमंत्रण देण्याची वेळ मंदिर समितीवर आली.

...अन् शिणवटा गेला..रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या दिंड्यांमध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदंगाच्या साथीने आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. रिंगण व उडीच्या कार्यक्रमानंतर श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा येळीव पाटी येथे विश्रांती घेऊन माळशिरस मुक्कामाकडे मार्गस्थ झाली.

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी